महाराष्ट्राची लूट थांबवणार आणि दिलेली वचनं आपण पूर्ण करणारच; उद्धव ठाकरे यांचा निर्धार

2 hours ago 1

डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मिंधे आणि भाजपवर आसूड ओढले. भाजपचे हिंदुत्व फसवे आहे म्हणून आपण त्यांची साथ सोडली, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आताची भाजप संकरीत झाली आहे. आता नीतीमत्ता आणि सुसंस्कार त्यांच्याकडे नाहीत, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

भाजपने विश्वासघात म्हणून भाजपला सोडून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. मिंधेचा मुलगा, पैशांचा महापूर आणि त्यांना आव्हान देणाऱ्या वैशालीताई होत्या. तरीही 4 लाख मंत आपल्याला या मतदारसंघात मिळाली. त्यांचा पराभव करायला पंतप्रधानांना मैदानात यावे लागते, हे दुर्दैव आहे. एका महिलेचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरतात, हे कोणत्या संस्कृतीत बसते आणि हे कोणते हिंदुत्व, असा सवालही त्यांनी केला.

आपल्याला वाटले, आता डोंबिवलीचा विकास झाला असणार, रस्ते चकाचक झाले असणार, पोस्टर होर्डिंग्ज मोठेमोठे लागले आहेत. केवढा पैसा खाल्लाय तो बघा. जाहिराती तुंबळ. मलई खाऊन इथून निवडून यायचे आणि कोकण ओरबाडायचे असे इथल्या आमदाराचा उद्योग आहे. जनता विश्वासाने त्यांना मतं देत आहे, तरीही सिव्हिल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज नाही. गेली पाच वर्षे सोडली तरी त्याआधी आम्ही त्यांच्यासोबत होतो. हिंदुत्वासाठी आम्ही त्यांना साथ दिली. तरीही अजून इथे प्रथामिक सुविधा का नाही, याचे उत्तरं कोण देणार, असा सवालही त्यांनी केला.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन यांच्याशी आमचे चांगले संबंध होते. त्याकाळी सुसंस्कृत, नीतीमत्ता पाळणारा भाजप होता, आताच भाजप संकरीत आहे. त्यांच्या राजकीय गर्भात इतर पक्षांच्या भष्टाचाऱ्यांची बीजे असलेल्या व्यक्ती घेतल्या आहेत. त्यामुळे भाजप संकरीत झाला आहे. ते आता थापाही मारत आहेत. त्यांच्या थापा किती काळ सहन करायच्या, असेही ते म्हणाले.

आपण भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यातील अनेकांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आपला प्रश्न आहे की, याच भाजपासाठी त्यांनी ही मेहनत केली का, अशा आपला सवाल आहे. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतात की, आता आम्हांला संघाची गरज नाही, याचसाठी का त्यांनी भाजपसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या होत्या. त्यांनी जे शिवसेनेसोबत केले तेच आता संघासोबत करत आहेत. वापरा आणि फेका, हेच त्यांचे धोरण आहे, अशा लोकांना पुन्हा डोक्यावर घेणार का, असा सवाल आपण त्यांना केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेतील प्रमुख मुद्दे

अदानीच्या घशात इथल्या जमीनी घालत आहेत.
इथले उद्योग गुजरातमध्ये नेत आहेत.
भाजपचे हिंदुत्व फसवे असल्याने आम्ही त्यांची साथ सोडली
त्यांचे हिंदुत्व घरं पेटवणारे आहे, तर आमचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे
देवेंद्र फडणवीस म्हणतात, मतांचं धर्मयुद्ध करा, हे निवडणूक आयोगाला चालते का
हिंदू हा तुझा धर्म हे आमच्या गीतातील शब्द काढायला सांगितले, आम्ही नाही काढले
आधी स्वतःचे जॅकेट सांभाळा, नंतर धर्मयुद्धाच्या बाता मारा
टरबूज कधी धर्मयुद्ध करू शकते काय
आपल्या निष्ठा महाराष्ट्राच्या मातीशी आहेत
मी लढतोय आणि लढणार, महाराष्ट्र हिताच्या आड येणाऱ्यांचा मुकाबला करणारच, हा निर्धार करत मैदानात उतरलोय
गद्दाराना सोबत घेत आमच्या अंगावर येतात, पक्ष, चिन्ह चोरले त्यांना आपल्या अंगावर सोडत आहेत
मिंध्यांना आव्हान आहे, हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचे नाव, फोटो लावत मैदानात उतर
काम केलंय भारी म्हणजे गद्दारी केली भारी, म्हणून आली माजोरी
आता पुढची तयारी म्हणजे आहे तेपण सर्व साफ करून टाकणार आहेत.
निष्ठा म्हणजे काय ते माहित नसलेले आम्हांला हिंदुत्व शिकवत आहेत
त्यांना शिवसेनेचा रिमोट हवा होता, तो आपण दिला नाही म्हणून त्यांनी गद्दारांना सोबत घेतले
उद्धव ठाकरे यांनी निष्ठा आणि कोन्होजी जेधे यांच्या निष्ठेचा दाखला दिला.
इतिहासातील अशा मावळ्यांमुळे आजचा महाराष्ट३ बघू शकतोय
गद्दारी फक्त शिवसेनेशी झाली नाही, महाराष्ट्राशी आणि भगव्याशी गद्दारी झाली आहे
एक हे तो सेफ है हा नारा भाजपासाठी आहे, त्यांना प्रतिस्पर्धी निर्माण झाले की मोदी अनसेफ होतात
जे. पी. नड्डा म्हणाले फक्त भाजप राहील, इतर पक्ष संपतील, असेल हिंमत तर संपवून दाखवाच
त्यांनी पक्ष फोडला, संभ्रम निर्माण केला, तरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवू शकलेले नाही.
गुजरात आणि मराठी माणूस यांच्यात आम्हांला वाद करायचा नाही, कधीही केलेला नाही
गुजरात आणि इतर राज्ये असा संघर्ष उभा करत ते भिंत उभी करत आहेत
छत्रपती शिवाजी महाजारांच्या नावानं मतं मिळवायची होती म्हणून घाईघाईत पुतळा उभारला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही त्यांनी भ्रष्टाचार केला,
या दुर्दैवी घटनेमुळे राज्यात उसळलेले वादळ मिंधेंना उडवून लावणार आहे
महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा, याचा निर्णय आता जनतेने घ्यायचा आहे
गद्दारांना 50 खोके आणि मेहनत करणाऱ्या, स्वाभिमानी महिलेला फक्त 1500 रुपये
जनतेच्या लुटीचा पैसा ते महिलांना देत आहे
कंत्राटदारांचा विकास हाच यांचा विकास आहे
महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या आड आपण आलो आणि येणारच
ही लूट आपण थांबवली तरी आपण दिलेली वचनं आपण पूर्ण करणारच

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article