मुंबईहून विमानाने आलेले 17 किलो सोने अडवले:निवडणूक आयोगाचा परवाना आणा, तपासणी अधिकाऱ्यांचे निर्देश

1 hour ago 1
लग्नाच्या मुहूर्तासाठी मुंबईहून विमानाने आलेले १७ किलो सोने (१४ कोटी) आणि १५ किलो चांदीचा (१३ लाख) माल तपासणी नाक्यावर थांबवून अंबाझरी पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यापूर्वी विदर्भात तिवसा व ब्रम्हपुरी येथे तर पुण्यात अशाच प्रकारे सोने चांदीचा माल पकडण्यात आला होता. मात्र जीएसटी भरल्याच्या पावतीसह सर्व कागदपत्रे असल्यामुळे सोडावा लागला अशी माहिती आॅल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमॅस्टिक काउन्सिलचे उपाध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिली. अधिकारी हीरोगीरी करण्यासाठी नाहक वेठीला धरत असल्याचा संताप रोकडे यांनी व्यक्त केला. नागपूर शहर व जिल्ह्यात रोज कमीतकमी २५ ते ५० कोटींचा माल विकल्या जातो. शनिवारीही मुंबईवरून खेप नागपुरला विमानाने आली. येथून अमरावती व अकोला येथे जात होता. सर्व कागदपत्रे, जीएस. टी. पेड बिल आहे. निवडणूक आयोगाची एसओपी फाॅलोअप केली आहे. सिक्वेल लाॅजिस्टिक कंपनी या मालाची वाहतूक करते. दोन विमानतळांवरून क्लिअर झालेला माल नाहक थांबवल्याचे रोकडे यांनी सांगितले. रोज किमान २० ते २५ जणांचा माल येतो. सध्या आचारसंहीता असल्याने जागोजागी नाकेबंदी आहे. अंबाझरी प्रभाग ५६ येथे तपासणी नाका आहे. नोडल आॅफिसर तेलंग आहे. त्यांनी हा माल अडवला. कंपनीच्या व्यवस्थापकाने रोकडे यांच्याशी बोलणे करून दिले. रोकडेंनी तेलंग यांना सर्व कागदपत्रे असल्याने सोडण्याची विनंती केली असता जीएसटी तपासायचे म्हटले. जीएसटी अधिकाऱ्याने येवून जीएसटी पेड माल असल्याचे सांगितल्या नंतरही गाडी अंबाझरी पोलिस ठाण्यात जमा केली. शेवटी तर सोने कोणत्या मार्गाने नेणार याची निवडणूक आयोगाची परवानगी अाणण्यास सांगितले. असा मार्ग कसा सांगणार? असा सवाल रोकडे यांनी केला. तीन दिवसांनंतर गाडी सोडावीच लागेल. कारण सर्व कागदपत्रे आहे असे ते म्हणाले. दुकाने बंद ठेवायची काय आॅल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी डोमॅस्टिक काउन्सिलचे उपाध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले, निवडणूकीत आम्ही आमची दुकाने बंद ठेवायची का? पर्सनल इंटरेस्ट वा हीरोगीरी करण्यासाठी अधिकारी असे करतात. या अधिकाऱ्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. मुंबई आणि नागपूर विमानतळावरून क्लिअर झालेले सोने चांदी अकारण अडकवून ठेवले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article