Published on
:
16 Nov 2024, 5:00 pm
Updated on
:
16 Nov 2024, 5:00 pm
नागपूर : महाविकास आघाडीने काँग्रेस मुस्लिम समाजाचाा एक्स्ट्रीम पोलरायझेशन करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही ते विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे रोडमॅप नाही. फक्त जातीयवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत असा घणाघाती आरोप भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला. जात, धर्माचा वापर करून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने सुरू केलेला व्होट जिहाद खेदजनक आहे. तुम्हाला 17 मागण्या दिल्या त्या तुम्ही मान्य करता, या मागण्या भयानक आहेत. दंगलीतील मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरील केसेस परत घ्या आरएसएसवर बंदी घाला या मागण्या यात आहेत.
सज्जद नेमाणी वोट जिहाद करायला सांगताहेत. वोट जिहादचे सूत्रधार, सिपेसालार हे शरद पवार आहेत. उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले सहकारी आहेत असेही जाहीरपणे सांगतात. निवडणुकीच्या काळात इतकं लांगुलचालन आम्ही यापूर्वी कधीही बघितले नव्हते. फकत अल्पसंख्यांक मते मिळवण्यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावे लागेल. धर्मयुद्ध लढावे लागेल. जी बहुसंख्य मते आहेत त्यांना पुनर्विचार करावा लागेल
एक व्हावे लागेल यावर फडणवीस यांनी भर दिला.
नोमानीचा दुसरा व्हिडिओ आला त्यात काही लोकांनी लोकसभेत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान केले त्यांना शोधून काढा आणि दाणापाणी बंद करा सोशल बायकॉट करा असे ते सांगत आहेत. स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे महाविकास आघाडीचे लोक यावर एकही शब्द बोलत नाहीत. हे एक्स्ट्रीम पोलरायझेशन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करत आहे. त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ. मुळात सोशल बायकॉट करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे.
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात इलेक्शन कमिशनला तक्रार केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की एक राहाल तरच सेफ राहू, एक आहे ते सेफ आहे. आज काँग्रेस जाती-जातीत विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे असेही फडणवीस म्हणाले.