धामणगाव येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी करताना अधिकारीPudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 3:33 pm
Updated on
:
16 Nov 2024, 3:33 pm
अमरावती : महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या बॅग तपासणीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय.दरम्यान शनिवारी (दि.१६) अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे हेलीपॅडवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी करण्यात आली. त्यामुळे यावरून यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत टीका केली आहे. राहुल गांधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शनिवारी धामणगाव रेल्वे येथे आले होते.
निवडणूक विभागाने निष्पक्ष रहावे अशी सगळ्यांची अपेक्षा असते. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करता तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बॅगच्या तपासणी का होत नाही, असा संतप्त सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.
निवडणूक विभागाकडून राज्यात मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभावर लक्ष ठेवून हेलीपॅड वरच त्यांच्या बॅग व वस्तूंची तपासणी होत आहे. यापूर्वी देखील निवडणूक विभागाने नेत्यांच्या बॅगची तपासणी केलेली आहे.