प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
:
16 Nov 2024, 1:14 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:14 pm
वर्धा : सध्या एपीके फाईल च्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढीस लागलेले आहेत. एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर आलेल्या प्रो फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरताच 14 लाख 91 हजार रुपयांनी खाते रिकाम झाले. ही फसवणुकीची घटना शहरात उघडकीस आली.
लक्ष्मीनगर येथील 53 वर्षीय व्यक्तीस अज्ञात आरोपीकडून व्हाट्सअपला पीएनबी अप्लिकेशन अपडेट करण्यासाठी एपीके फाईल आली. संबंधित व्यक्तीने एपीके फाईल डाऊनलोड करून ओपन केली. त्यात आलेला प्रो फॉर्म ओपन करुन त्यातील माहिती भरली. त्यामध्ये स्वतःबद्दलची माहिती, बँक खाते, मोबाईल क्रमांक आदी माहिती भरली होती. दरम्यान त्यांनी मोबाईलवर बँक खाते तपासले असता त्यातुन रक्कम कमी झाल्याचे दिसले. बँकेत जाऊन चौकशी केली असता बँक खात्यातून तब्बल १४ लाख ९१ हजार रूपये कमी झाल्याचे दिसून आले. यामध्ये आर्थिक फसवणुक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.