केज शहरात पथसंचलन करताना पोलीस, सीमा सुरक्षा दल.pudhari photo
Published on
:
16 Nov 2024, 3:04 pm
Updated on
:
16 Nov 2024, 3:04 pm
केज : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज शहारामध्ये सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी पथसंचलन केले.
आज दि. १६ नोव्हेंबर रोजी केज पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पथ संचलन केले. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी परासराम सिंग यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गा वरून शस्त्रासह हे पथ संचलन करण्यात आले.
या पथ संचलनात पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरिक्षक राजाभाऊ लंगडे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, गृहरक्षक दलाचे जवान कर्मचारी ,पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि गृह रक्षक दलाचे ४ अधिकारी तसेच १४४ जवान सहभागी झाले होते. सुरक्षा दलाच्या शस्त्र संचलनामुळे निवडणुकीच्या दरम्यान गडबड गोंधळ करणाऱ्या असामाजिक तत्व यांच्या विरुद्ध कठोर कारवाही करण्याचे देखील संकेत या पथ संचलनातून देण्यात आले आहेत.