सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारुन अटक केली आहे.file photo
Published on
:
08 Oct 2024, 5:06 am
Updated on
:
08 Oct 2024, 5:06 am
पनवेल : उरण-पनवेल महामार्गालगत जासई येथील सुरुंगपाडा येथे चहाची टपरी चालवण्याबरोबरच अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारुन अटक केली आहे.
राजन बाळा राठोड (३२) असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलीस पथकाने त्याच्या चहाच्या टपरीतून २१ ग्रॅम हेरॉईन आणि १ किलो गांजा तसेच चिलीम, रिजला पेपर, गोगो, सिल्वर फॉइल पेपर असा ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुंबईतील गोवंडी येथे राहणारा सराईत गुन्हेगार उरण-पनवेल महामार्गालगत एका पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये हेरॉईन आणि गांजा या सारख्या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.