Parbhani Case: पाय घसरून विहिरीत गेला तोल; परभणीत एकाच मृत्यू

2 hours ago 1

परभणी/चारठाणा(Parbhani):-  शेतातील विहिरीमध्ये मोटार टाकत असताना पाय घसरुन पडल्याने विहिरीतील पाण्यात बुडून ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील जांब बु. येथे घडली होती. या प्रकरणी २४ नोव्हेंबरला चारठाणा पोलिसात आकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत मोटार टाकत असताना घडली घटना

नंदाबाई बुधवंत यांनी खबर दिली आहे. रामराव दत्तराव बुधवंत (वय ६० वर्ष) असे मयताचे नाव आहे. १७ नोव्हेंबरला दुपारी १.३० च्या सुमारास रामराव बुधवंत हे शेतातील विहिरीमध्ये मोटार टाकत होते. यावेळी पाय घसरुन विहिरीत पडले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू (Death) झाला. सदर प्रकरणी २४ नोव्हेंबरला पोलिसात खबर देण्यात आली. तपास पो.ह. केजगीर करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article