Parbhani municipal: निविदेच्या कारणावरुन मनपा आवारात दोन गटात वाद

1 hour ago 1

गुरुवार दुपारची घटना निविदा भरण्यावरुन झाली धक्काबुक्की

परभणी (Parbhani municipal) : विकास कामांच्या निविदेच्या कारणावरुन दोन गट समोरा समोर आल्याने त्यांच्या अपसात वाद होऊन धक्काबुक्की झाल्याचा प्रकार गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास परभणी शहर महापालिकेच्या आवारात घडला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला.

या प्रकाराविषयी सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, महापालिका क्षेत्रात अल्पसंख्यांक बहुक्षेत्र विकास योनजेंतर्गत प्रत्येकी २५ लाख रुपयांप्रमाणे डझनभर कामे होणार आहेत. या कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत. याच निविदा भरण्यावरुन वाद झाल्याचे समजले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास निविदा भरणारे दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात शाब्दीक चकमक होऊन वाद झाला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी वाद मिटविला. त्यानंतर पुन्हा पंधरा ते वीस मिनिटानंतर या दोन्ही गटात वादाची परिस्थिती उद्भवली. सुरक्षा रक्षकांची हस्तक्षेप करत संबंधितांना मनपा परिसराच्या गेट बाहेर काढले.

महापालिका परिसरात नेमके काय झाले, वाद कशामुळे झाला याची माहिती घेत आहोत. मनपा परिसरात कोणी दुरवर्तन केले असेल तर पोलिसांना कळविण्यात येईल.
– मिनिनाथ दंडवते, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article