Parbhani Water Suppy: मासोळी प्रकल्प तुडूंब, गोदावरी नदी दुथडी भरून सुद्धा पाण्यासाठी भटकंती

1 hour ago 1

धरण उशाला अण कोरड घशाला, परभणीतील गंगाखेडकरांची अवस्था

परभणी/गंगाखेड (Parbhani Water Supply) : शहरातील नळाला पाणी पुरवठा करणारे मासोळी प्रकल्प तुडूंब भरले व गोदावरी नदी सुद्धा दुथडी भरून वाहत आहे. असे असतांनाही नळाला पाणी येत नसल्यामुळे शहर वासीयांना मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने धरण उशाला अण कोरड घशाला अशी अवस्था गंगाखेडकरांची झाली असून पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शहरातील महिलांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

गंगाखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मासोळी प्रकल्पात व गोदावरी नदी पात्रात तुडूंब पाणी भरलेले असतांनासुद्धा शहरातील नळांना पंधरा ते वीस दिवसानंतर पाणी सोडल्या जात असल्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात ही वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे शहरातील वैष्णव गल्ली, देवळे गल्ली, पाठक गल्ली, तिवट गल्ली, खडकपुरा, टोले गल्ली, माळी गल्ली आदी भागातील महिला व पुरुषांनी थेट नगर परीषद कार्यालय गाठून मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांची भेट घेत आम्ही राहत असलेल्या भागात कधी पंधरा तर कधी वीस दिवसांआड नळाला पाणी येत आहे असे म्हणत याबाबत पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केली तर कधी मोटार जळाली, वॉल खराब झाल्याचे सांगत वेळ मारून नेत जात आहे. नळाला पाणी मात्र सोडत नाही असे सांगितले.

ऐन सणासुदीच्या काळात सुद्धा गंगाखेड शहर वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे याबाबत संताप व्यक्त करून पाणी पुरवठा न होणाऱ्या भागाला आपण प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत किमान चार ते पाच दिवसांआड नळाला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. नगर परिषद कार्यालयात दिलेल्या निवेदनावर जयश्री रमेशराव पाटील, तृप्ती अनंत रामपूरकर, दिपाली रामदासी, स्मिता जोशी, दिपाली सुपेकर, शालिनी पाठक, भावना अंबेकर, वंदना रोडे, रेखा पाठक, ज्योती डहाळे, मिरा शेळके, सीमा धोंडरकर, रशिका केरकर, शिवकन्या पवार, संगीता जाधव, मंदा रामदासी, शैलजा धोंडरकर, मुक्ता बेदरे, अर्चना जोशी, दत्तात्रय गौतम, सुनिता जोशी, मनिषा मोकाशी, सीमा तेलंग, विद्या गळाकाटू, अंजली खळीकर, प्रतिभा आयचित, शुभांगी आवलगावकर, रेणुका कुलकर्णी, प्रभावती वरड, अलका मुलगिर, ललिता जोशी आदींसह बहुसंख्य शहर वासीयांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article