Parbhani: पोलीसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेणारे 50 गोवंश घेतले ताब्यात

1 hour ago 2

पालम (Parbhani) :- काल दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 6:50 दरम्यान मरडसगाव ते चाटोरी रोडवर नाव्हा फाट्यासमोर तिन आयशर गाड्यामधे गोवंश घेऊन जाणाऱ्या गाड्या पालम पोलीसांच्या सतर्कतेमुळे पकडल्या गेल्या. तीन आयशर मधे 50 गोवंश अत्यंत दाटीवाटीने भरलेल्या अवस्थेत वाहतूक करत असल्याचे व सर्व बाजुने ताडपञीच्या आच्छादनाने झाकलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी. सतीश दोनकलवार, पोलीस उप निरीक्षक कैलास देवघरे, एस.सी. केंद्रे, एस.पी.कोलमवाड, अंमलदार ठाकूर यांनी धाव घेऊन सदरील गाड्या थांबल्या व त्यांची तपासणी (Inspection)केली असता त्यात गोवंश भरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यापैकी कित्येक गोवंशांना जखमा झाल्या आहेत. गोवंश पकडल्यानंतर ते पालम येथील गंगाखेड रोडवरील सदगुरु बाळकृष्ण गोशाळेत आणून जखमी गोवंशावर डाॅ. डांगे यांच्या उपस्थितीत उपचार करत त्यांना चारा पाणी देण्यात आले.

पालमच्या मरडसगाव ते चाटोरी घटना

फिर्यादी कैलास देवघरे पोलीस उपनिरीक्षक यांच्या फिर्यादीवरून शेख कलीम शेख युसुफ, आखिल खान शब्बीर खान,शेख रहीम शेख सुकुर, मुबारक शहा वजीर शहा, वसीम मुस्तफा शेख, अरबाज महेबूब खुरेशी, रज्जाक मिरखान तडवी, नासेर नजीर शेख या आठ आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण प्रतिबंध विविध अधिनियमा कायद्यानुसार विविध कमलाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हात पकडलेल्या 50 गोवंशाची किंमत 6,35,000 व तिन आयशर ची एकूण किंमत मिळून 4820000 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील गुन्हातील आरोपींना सायंकाळी 8 वाजता कोर्टासमोर हजर केले असता आरोपींना मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) रवानगी केली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी. सतीश दोनकलवार, पोलीस उप निरीक्षक कैलास देवघरे, एस.सी. केंद्रे, एस.पी.कोलमवाड, अंमलदार ठाकूर पुढील तपास करीत आहेत.या धाडसी कारवाईत 50 गोवंशाना जिवदान दिल्याबद्दल पालम पोलीसांचे जनतेतून कौतुक केले जात आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article