Parbhani: भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

2 hours ago 1

चिखली(Buldana):- महायुती सरकारने ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयाचे जल्लोषात स्वागत चिखली समाजातील बहुभाषिक व सर्व शाखिय ब्राह्मण समाजातर्फे करण्यात आले. दि. २५ सप्टेंबर रोजी जुन्या शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच फटाके फोडून व मिठाई वाटप करून ब्राह्मण समाजाच्या वतीने आनंद साजरा केला गेला. महायुती सरकारच्या प्रतिनिधी व चिखली विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly constituencies)आमदार म्हणून ब्राह्मण समाजाच्या वतीने आ. श्वेताताई महाले यांचा यावेळी सत्कार करण्यात करून आभार मानण्यात झाले.

ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

राज्यातील महायुती शासनाने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत समस्त ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)व अजितदादा पवार यांचे या निर्णयाबद्दल चिखली शहरातील बहुभाषिक सर्वशाखीय ब्राह्मण समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कच्या निर्मितीसाठी ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल देखील राज्य शासनाला धन्यवाद देण्यात आले. याप्रसंगी आ. श्वेताताई महाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हिंदू धर्माच्या व देशाच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान असून या योगदानाची जाणीव महायुती सरकारने ठेवली.

ब्राह्मण समाजातील युवक – युवती तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या महिला व पुरुष यांना मोठा आर्थिक आधार

ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची अनेक वर्षापासूनची प्रलंबित मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यातून महायुती शासनाने पूर्ण केली असून वचनपूर्ती करणारे हे सरकार समाजातल्या सर्व घटकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील युवक – युवती तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या महिला व पुरुष यांना मोठा आर्थिक आधार मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ब्राह्मण समाजातील पात्र व होतकरू व्यक्तींनी या महामंडळाच्या योजनेचा जास्तीतजास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुकादास मुळे यांनी केले.

ब्राह्मण समाजातील पात्र व होतकरू व्यक्तींनी या महामंडळाच्या योजनेचा जास्तीतजास्त संख्येने लाभ घ्यावा

याप्रसंगी चिखली ब्राह्मण सभेचे अध्यक्ष भाऊसाहेब सराफ, सचिव रेणुकादास मुळे, रा. स्व. संघाचे माजी तालुका संघचालक अरविंदराव असोलकर, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, बालाजी अर्बनचे अध्यक्ष एड. मंगेश व्यवहारे, ज्येष्ठ नेते श्री रामदासभाऊ देव्हडे, खाण्डल विप्र समाजाचे पदाधिकारी गोपाल खंडेलवाल, शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब बाहेकर, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनिस, माजी नगरसेवक विजय नकवाल यांच्यासह विष्णुपंत जोशी, अशोकराव जोशी, रघुवीर देशमुख, किरण पिंपरकर, श्रीकांत कुळकर्णी, संजय डांगे, धनंजय चौधरी, समाजाचे पदाधिकारी भगवानराव चोपडे, रामकृष्ण कुडके, भिकू लोळगे, भगवान निंबाळकर, शंकर उद्रकर, तुकाराम सोळंके, सतीश हिवाळे आदी नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article