Pathari Rural Hospital: पाथरी ग्रामीण रुग्णालय: सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय कायाकल्प बक्षिसास पात्र

1 hour ago 1

परभणी/पाथरी (Pathari Rural Hospital) : आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कायाकल्प बक्षीस साठी पात्र आरोग्य संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले असुन सर्वेक्षणा दरम्यान कायाकल्प आणि इको फ्रेंडलीमध्ये पाथरी ग्रामीण रूग्णालयाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे रुग्णालय यावर्षीही बक्षिसास पात्र ठरले आहे .

कायाकल्प अंतर्गत करण्यात आलेल्या अवलोकन दरम्यान (Pathari Rural Hospital) पाथरी ग्रामीण रुग्णालयातील सर्व सोई,सुविधा इ बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पाहणीसाठी आलेल्या उच्च सदस्यांनी समाधान व्यक्त केले होते. रुग्णालयास सुविधा पुरविताना कायाकल्प चे बाह्य अवलोकानचे भाग असलेले कायाकल्प आणि इको फ्रेंडली मध्ये उत्कृष्ट कर्मगिरी केली असून सदरील कामगिरीमुळे ग्रामीण रुग्णालय हे बक्षिसेस पात्र ठरल्या असल्याचे प्रशस्तीपत्र आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक ,राष्ट्रीय आरोग्य अभियान ,महाराष्ट्र यांनी नुकतेच एका पत्राद्वारे कळविले आहे. असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुमंत वाघ यांनी सांगितले आहे.

सदरील अवलोकन यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.आर से जाधव, डॉ.से एन धाबाले, डॉ.महाजन ,अधीपरीचारिका शोभा गुडमे,अरुण गव्हाणे, प्रशांत दळवी, रावते, मिसाळ,म्हस्के,शीतल ससाणे, कोथाळे, श्रुती ढवळे ,अंजना मुंडे,सहाय्यक अधिक्षक एम.के.खराते ,कनिष्ठ लिपिक व्ही जी धायजे,औषध निर्माण अधिकारी सलीम शेख ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ सोनटक्के, क्ष किरण तंत्रज्ञ खलापकर आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असुन जिल्हा स्तरावरून डॉ.नागेश लखमावार डॉ.तपसे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये कायाकल्प उपक्रमाची ची अंमल बजावणी संपूर्ण राज्यातील (Pathari Rural Hospital) ग्रामीण जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,सामान्य रुग्णालय,स्त्री रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र या ठिकाणी तर शहरी/नागरी ठिकाणी असलेले नागरी समूदाय आरोग्य केंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आली. चांगली आरोग्य व्यवस्था स्थापन करणे,केंद्र शासन व राज्य शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच मार्गदर्शनचे अंमलबजावणी करीत ग्रामीण,अती दुर्गम भागातील रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवितात येईल. असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दिशा निर्देशित करण्यात आल्या प्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही,वेळी वेळी पुरविण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचना प्रमाणे रुग्णांना सुविधा भेटते किंवा नाही,आरोग्य कर्मचारी यांचे रुग्णांशी वागणूक,अत्यावश्यक तसेच दैनंदिन आवश्यक असलेल्या औषधांची उपलब्धता,सुरक्षित प्रसूती,प्रसूती पश्चात स्त्रियांना मोफत विविध सुविधा,लाभार्थ्यांना लाभ,नवजात बालकांना उपलब्ध आरोग्य सुविधा,रुग्णालय व रुग्णालायीन परिसर स्वच्छता,आवश्यक मनुष्यबळ इ बाबींचे अवलोकन कायाकल्प द्वारे करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article