Published on
:
25 Nov 2024, 12:55 pm
Updated on
:
25 Nov 2024, 12:55 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क - दिग्दर्शक राम गोपाल वर्माला मुख्यमंत्री नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याविषयी सोशल मीडियावर अपमानजनक विधान करणे भारी पडले आहे. रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेश पोलिस वर्माच्या हैदराबाद येथील घरी पोहोचल्याचे म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांविरोधात सोशल मीडियावर एक अपमानजनक कंटेंट पोस्ट केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशातील ओंगोल ग्रामीण पोलिसांची टीम सोमवारी रामगोपाल वर्माच्या हैदराबाद स्थित घरी पोहोचली. पण, ज्यावेळी पोलिसांची टीम घरी पोहोचली तेव्हा वर्मा घरी उपस्थित नव्हता. राम गोपाल वर्मा कोईमत्तूरला रवाना झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
काय आहे राम गोपाल वर्माचे प्रकरण?
सूत्रांनुसार, ११ नोव्हेंबर रोजी राम गोपाल वर्मा विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलिस ठाण्यात तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी त्यांनी चार दिवसांचा वेळ मागितला होता. पण, हजर न राहिल्याने पोलिस टीम हैदराबाद येथील घरी पोहोचली.
राम गोपाल वर्मावर मुख्यमंत्री नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मंत्री नारा लोकेश यांच्या विरोधात काही अपमानजनक स्टेटमेंट केले होते. ११ नोव्हेंबरला वर्माविरोधात तक्रार दाखल झाली होती. १३ नोव्हेंबरला त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवून तपास अधिकाऱ्यांसमोर १९ नोव्हेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले होते.