रिसोड (Risod) :- रिसोड-मालेगांव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नुकतीच मोठ्या अटितटीत पार पडली, जेमतेम दोन महिण्याचा अनुभव या विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भावनाताई गवळी यांच्या कडे आसतांनी ऐनवेळेवर गवळी यांच्या विचारांशी एकरूप होत.
महाविकास आघाडी, अपक्षापेक्षा महायुतीचा मतदानाचा वाढला आलेख
काही इतर पक्षातील प्रमुख पदाधिका-यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde)यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. भावनाताई गवळी यांची ताकद वाढली, रिसोड-मालेगांव विधानसभा मतदारसंघातील यावेळची लढत ख-या अर्थाने तुल्यबळ ठरली, कारण महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार अमित झनक, महायुतीच्या उमेदवार विधान परीषद आमदार भावनाताई गवळी आणि माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली. तालुक्यातील चिंचांबाभर, भर जहागीर सर्कल मध्ये विद्यमान आमदार अमित झनक यांच्या मागील तीन टर्म मधील केलेल्या सर्वांगीण विकासाला न्याय मतदार आपल्या मतदानरूपाने देतील तर माजी खा.अनंतराव देशमुख यांचे होमपिच म्हणून भर जहागीर, चिंचांबाभर सर्कल कडे पाहील्या जाते. कारण या दोन्ही सर्कल मध्ये माजी खा.अनंतराव देशमुख यांच्या पट्टीच्या कार्यकर्त्याचा भरणा आहे विशेष म्हणजे रिसोड कृषि उत्पन्न बाजार (Agricultural nutrient market) समिती सभापती, उपसभापती, संचालक, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापदी, जिल्हामध्यवर्ती बॅक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आशा नानाविध पदावर माजी खा.अनंतराव देशमुख यांनी विश्वासु कार्यकर्त्यांना अनेकदा संधी दिल्या,या मुळेच अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना भरघोष गठ्ठा मतदानाची अपेक्षा होती.
अनेकांच्या फितुरीचा फटका भाऊसाहेबांना बसल्याची राजकीय चर्चा
परंतु अनेकांच्या फितुरीचा फटका भाऊसाहेबांना बसल्याची राजकीय चर्चा आहे. तर दुसरी कडे विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांनी येथिल विधानसभा उमेदवारीवर दावा करीत उमेदवारी हाशील केली.आणि जेमतेम अवघ्या दोन महिण्याच्या कालावधीत आपला जोमाने प्रचार करीत,अनेक कार्यकर्त्यांची गुंफण केली,यामध्ये भर जहागीर जिल्हा परिषद सर्कल मधील अनिलभाऊ गरकळ यांचा आवर्जुन उल्लेख करता येईल. अनिलभाऊ गरकळ यांनी काही विश्वासु व्यक्ती सोबत रात्रंदिवस कष्ट करीत जिवाचे राणे केले. आणि स्पर्धेतील इतर उमेदवारांपेक्षा जास्त मतदान ताईच्या पदरात पाडले. भर जहागीर सर्कल मधील भर जहागीर 813, मांगवाडी 662, गणेशपुर 319, पाचांबा 90, मोरगव्हाण 491, मोप 654, बोरखेडी 688, शेलुखडशे 664, चाकोली 148 यासह चिंचांबाभर सर्कल मधील कंकरवाडी, चिंचांबाभर, आगरवाडी, जवळा, मांडवा,मोहजाबंदी, आसोला, कु-हा, लोणी खुर्द, लोणी बु.येथिल कार्यकर्त्यांनी सुध्दा भावनाताई गवळी यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले.
महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्याने येथे महाविकास आघाडी अमित झधक विजयी
अवघ्या दोन महिण्यातील मोठ्या प्रमाणात भावनाताई गवळी यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. परंतु महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्याने येथे महाविकास आघाडी अमित झधक विजयी झाले.परंतु गवळी यांचे परतीस्पर्धी उमेदवरांना आपल्या हक्काच्या भर जहागीर आणि चिंचांबाभर जिल्हा परीषद सर्कल मध्ये अपेक्षीत मतदान मिळाले नाही तेथे गवळी यांनी जादा मतदान घेतले,भर जहागीर जिल्हा परीषद सर्कल मध्ये भावनाताई गवळी 4510 अनंतराव देशमुख 3256 तर विद्यमान आमदार अमित झनक 2729 मिळालेले मतदान आहे. यासाठी माजी जिल्हापरीषद सदस्या उषाताई गरकळ यांचे पुत्र तथा जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ गरकळ यांच्या अथक प्रयत्नाची पराकाष्ठा दुर सारता येणार नाही हे विशेष.