परभणी/सेलू (Salu Hoardings) : शहरात अहिल्यानगर, रायगड कॉर्नर, बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, हुतात्मा बहिर्जी नाईक6 क्रांतीचौक, आठवडी बाजार, जिंतूर नाका सह इतर ठिकाणी अनाधिकृत होल्डिंग मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या आहेत. या होर्डिंग्जमुळे काही ठिकाणी वाहनास अडथळा येत असून समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहनाला या होर्डिंगमुळे जिंतूर नाका परिसरात तसेच रायगड कॉर्नर परिसरात वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे.
या अनाधिकृत वाढत्या होर्डिंग्ज कडे (Salu Hoardings) नगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान होर्डिंग्ज च्या या वाढत्या बॅनरबाजी मुळे चौक आणि कॉर्नर विद्रूप झाले आहे. शहरातील बहुतांश होल्डिंग या अनाधिकृत आहेत बॅनर ,फोल्डिंग पोस्टर लावण्यात येऊ नये अशी ताकीद पालिकेच्या वतीने देण्यात आली तर संभाव्य बॅनरबाजी टळेल परंतु याकडे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष करण्यात येत आहे.
रस्त्यावर तसेच रेल्वे स्टेशन ते रायगड कॉर्नर ,रेल्वे स्टेशन ते वालूर रोड या रस्त्यावरील पोलवर देखील अनेक ठिकाणी अशी बॅनरबाजी चालू आहे. राजकीय नागरिक तसेच इतर जाहिरातदारांना बॅनरबाजी लावायची असेल तर त्यांनी यासंदर्भात अधिकृत परवानगी घेऊनच लावावी असे संकेत असताना (Salu Hoardings) पालिकेच्या दुर्लक्षामुळे हे संकेत पायदळी तुडवले जात असून वाढत्या बॅनरबाजी मुळे धोका निर्माण झाला आहे.