Sanjay Raut connected Mahayuti : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानानंतर राज्यात विविध संस्थांचे Exit Poll आले. त्यातील तिघांनीच महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. तर इतरांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकली. तर आता महायुती अपक्षांना का चुचकारते आहे असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी भरभरून मतदान केले. शहरी भागापेक्षा निमशहरी आणि आदिवासी बहुल भागात अधिक मतदान झाले. त्या पाठोपाठ आलेल्या विविध संस्थांच्या Exit Poll ने महायुतीच्या पारड्यात मतांचा कौल टाकला. या एक्झिट पोलचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. लोकसभेला आम्हाला केवळ 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकालानंतर काय झालं? असा सवाल त्यांनी केला. तर जर बहुमताचा आकडा महायुतीकडे आहे तर मग ते अपक्षांना लोणी का लावत आहेत, असा रोकडा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. काय म्हणाले राऊत?
एक्झिट पोलची ऐशी की तैशी
समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळतील असे भाकीत वर्तवले होते. त्यांनी 40 जागा जिंकल्या. मोदींना 400 जागा मिळणार, बहुमत सुद्धा मिळालं नाही. लोकसभेला आम्हाला दहा पण जागा मिळणार नाही, असा दावा करण्यात आला. आम्ही 31 जागा खेचून आणल्या. या सर्वेची ऐशी की तैशी असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
हे सुद्धा वाचा
सविस्तर बातमी लवकरच…