दिल्लीतील सत्र न्यायालयात भाजपला झटका दिला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजपने मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
राऊस एव्हेन्यू येथील सत्र न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्यात दंडाधिकाऱ्यांसमोरील कारवाईला स्थगिती दिली आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी निश्चित केली आहे.
भाजप नेते प्रवीण शंकर कपूर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जारी केलेल्या समन्सविरोधात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता याला स्थगिती देण्यात आली आहे.
Delhi CM Atishi defamation case | Sessions Court at Rouse Avenue stayed the proceedings before a Magistrate in a defamation case against Delhi CM Atishi.
Sessions court has listed the matter for hearing on December 2.
Delhi CM had approached the sessions court against the…
— ANI (@ANI) November 22, 2024