Published on
:
20 Jan 2025, 4:04 am
Updated on
:
20 Jan 2025, 4:04 am
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.
भारताचा महागाई दर डिसेंबरमध्ये 5.22 टक्केपर्यंत खाली आला जो नोव्हेंबर महिन्यात 5.38 होता. अमेरिकेचा महागाई दर डिसेंबर महिन्यात 0.2 टक्क्यांनी वाढून 2.9 टक्के झाला. जरी तो वाढला असला तरी बाजार तज्ज्ञांनी अगदी तेवढाच अंदाज वर्तवला होता. दिवसागणिक वाढणार्या डॉलरने किंचित का होईना नरमाई दाखवली आणि इस्रायल-हमास संघर्षात शस्त्रसंधीची आशा दिसू लागली. या चार अल्पशा सकारात्मक बातम्यांनी बाजारतज्ज्ञांची निफ्टी 23000 च्या खाली घसरण्याची भीती खोटी ठरवली आणि 23047.25 ला धडकून निफ्टीने Pull-back दाखवला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सुरुवातीला मोठी घसरण होऊनही 23200 च्या वर टिकून राहण्यात निफ्टी यशस्वी झाला.
Media, Realty आणि Pharma ह्या कंपन्यांची घसरण मागील सप्ताहातही सुरूच राहिली. सारेगामाझील, पीव्हीआर आयनॉक्स, सन टीव्ही हे मिडिया शेअर्स मंदीत ट्रेड करत होते. डिश टीव्ही आणि नेटवर्क 18 चे शेअर्स सर्वात जास्त घसरले. नेटवर्क 18 चा निव्वळ तोटा 1435 कोटी झाल्याने हा शेअर कोसळला. Realty मध्ये लोढा (मॅक्रोटक डेव्हलपर्स) सप्ताहात सर्वाधिक घसरूनही कोटक सिक्यूरिटीजने हा शेअर णसिीरवश केल्यामुळे अखेरच्या दिवशी तो सहा टक्के वाढला. फार्मा सेक्टरमधील Biocon आणि Divis ङरल वगळता झाडून सारे शेअर्स 4 ते 8 टक्के घसरले. कल्याण ज्वेलर्सचा शेअर मागील सप्ताहात 25 टक्के कोसळला. (रु. 501.50) कारण काय तर कंपनीतबद्दल काही बातम्या बाजारात प्रसारित झाल्या. कंपनीकडे असलेल्या Inventory चे म्हणजे Stocks Mo Valuation वाढवून दाखवणे, 20 टक्के शेअर्स गहाण असणे वगैरे आरोप त्यामध्ये आहेत. कंपनीच्या वतीने हे सर्व आरोप निराधार असल्याचा खुलासाही करण्यात आला. मार्च 2021 मध्ये Listing झाल्यापासून कंपनीने उत्तम कामगिरी दाखविली आहे. आज हा शेअर त्याच्या उच्चांकापासून 37 टक्के खाली आहे. वरील सर्व बाबींचा गुंतवणूकदारांनी अगदी सखोल अभ्यास करावा आणि संधीचा शोध घ्यावा.
दोन तुल्यबळ मल्लांची रोमांचक खडाखडी सुरू असावी, तशी FII आणि DII ह्यांची खरेदी विक्रीची मालिका प्रत्येक सप्ताहात पाहायला मिळते आहे. ह्या सप्ताहातील खालील आकडे पाहा..
FIIS विक्री-रु. 25318.70 कोटी
DIIS खरेदी - रु. 251510. 30 कोटी
रेल्वेचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण ह्यांवर मोदी सरकारचा जास्तीत जास्त भर आहे हे आपण पाहतो आहोत. त्यामुळे अंदाजपत्रकाआधीची तेजी सर्वात आधी रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये येते. मागील आठवड्यातही अशीच तेजी ह्या शेअर्समध्ये दिसून आली आणि आणखी दोन आठवडे तरी ती तशीच सुरू राहण्याची शक्यता आहे.
अशीच तेजी शुक्रवारच्या सत्रात Garden Reach Shipbuilders & Engineers (GRSE) ह्या जहाजबांधणी कंपनीच्या Hindustan Aeronautics (HAL) ह्या शेअर्समध्ये दिसून आली. ही तेजीदेखील अंदाजपत्रक सादर होईपर्यंत अशीच सुरू राहील. बाजारात जेव्हा अनिश्चितता असते, अस्थिरता असते तेव्हा मुख्य निर्देशांकांकडे लक्ष न देता अभ्यास करून असे शेअर्स निवडावेत आणि त्यांच्याकडे लक्ष द्यावे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सत्ताग्रहणाकडे अवघ्या जगातील बाजारांचे लक्ष लागून राहिले आहे. पुढील संपूर्ण आववडा त्याचीच छाया सर्व बाजारांवर असेल. ट्रम्प ह्यांची राजकीय धोरणे, त्यांची Tariff Policy त्यांचे व्हीसा धोरण या गोष्टींमुळे सर्व बाजार विचलीत होतील.
असे असते तरी निवडक सेक्टर्समधील शेअर्समध्ये बजेटपूर्व रॅली सुरू झाली आहे, हे हळूहळू दिसू लागले आहे. वर रेल्वे, जहाज आणि डिफेन्स कंपन्यांचे उदाहरण दिलेच आहे. याचबरोबर येणार्या बजेटमध्ये आणखी कोणत्या क्षेत्रांमध्ये निधीचा ओघ वाढू शकतो? परदेशी गुंतवणूक क्षेत्रात योगदान भारतातील कमर्शिअल इन्फ्रा आणि रिअॅल्टी क्षेत्रात वाढण्यासाठी शासन प्रोसाहन देईल, असे वाटते. DLF, KNR, Construction, Oberai Realty Prestige, Estate, Brigade हे शेअर्स लक्ष देण्याजोगे आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हे दोन्ही या सरकारचे प्रकल्प आहेत. Aavas Financiers, L & T , KNR Construction, Ashoka Buildcon हे शेअर्स त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील. एकूणच Infra आणि Housing सेक्टरला चालना द्यायची तर सिमेंट स्वस्त झाले पाहिजे. सध्या सिमेंटवर 28 टक्के GST आहे. तो कमी होईल काय ? तसे झाले तर Ultraltech, Ambuja, Acc, JK Laksh mi, Star Cement हे शेअर्स सुसाट धावू लागतील. देशांतर्गत दळणवळण (Logistics) आणि मत्स्योत्पादन ह्या दोन क्षेत्रांकडे सरकारचे लक्ष अलीकडे अधिक वळू लागले आहे. Container Corporation, Avanti Feeds हे शेअर्स आपल्या वॉचलीस्टमध्ये असू द्यावेत.
शेवटी Logistics चाच विषय निघाला म्हणून एक शेअर ओघाने अभ्यासासाठी सूचवावासा वाटतो. Tiger Logistics ही ती कंपनी ! ह्या शेअरचा शुक्रवारचा बंद भाव आहे रु. 65.60 पी. ई रेशा 34.9 ROE 12.4 ROCE 16.7 आहे तीन वर्षाचा सरासरी ROE 28 आहे. Sales Growth 13 टक्के तर Profit Growth 47 टक्के आहे. आताच ह्या शेअरकडे लक्ष जाण्याचे कारण काय ? तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत FIIS नी या शेअरमध्ये आपली खरेदी भरपूर वाढवली आहे. असेच आणखी दोन शेअर्स आहेत. त्यांचाही जरूर अभ्यास करावा. PC Jewellers आणि शेअर बाजार हा रत्नाकर आहे. निरंतर अभ्यास करत राहावे, अशी रत्ने अगणित सापडतात.