भारतीय क्रिकेट संघाचा डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांचा मागे एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्या तब्येती संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. विनोद कांबळी याला अनेक आजार झाल्याने तो सध्या कोणाच्याही आधाराशिवाय चालू शकत नाही असे म्हटले जात आहे. याच दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याला ठाण्याच्या एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आता तेथे उपचार केल्यानंतर नुकताच त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने विनोद कांबळी याला वानखेडेच्या सुवर्ण जयंती समारंभानिमित्त कार्यक्रमात बोलावले होते. या कार्यक्रमाला तो पत्नी एंड्रीया हीच्या हाताला धरुन या कार्यक्रमात येतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारताचे आणि मुंबईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या क्रिकेटर्सना स्मृती चिन्ह देऊन सन्मान केला. या कार्यक्रमात मुंबईचे अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. विनोद कांबळी देखील या कार्यक्रमाला हजर होता.
स्टेडियम कर्मचाऱ्यांना किट भेट
वानखेडे स्टेडियममध्ये ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई क्रिकेट संघाने ( एमसीए ) स्वर्ण जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्टेडियमच्या १७८ कर्मचाऱ्यांना ३० हून अधिक वस्तू असलेले गिफ्ट भेट देण्यात आली आहे. याच तांदूळ, गहू, ब्लॅकेट, ब्रश, बुट्स ,चादर, टी-शर्ट, गॉगल, जॅकेट, छत्री, बॉटल सह सर्व आवश्यक वस्तूंचे किट भेट दिले आहे. कर्मचाऱ्यांना नेहमी कॅश व्हाऊचर दिले जाते. यंदा आम्ही काही वेगळी भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे एसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले.