विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. एकनाथ पवार यांचा राजीनामा हा शिवसेना ठाकरे गटासाठी नांदेडमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते.
भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार होते. मात्र त्यांनी आता राजीनामा दिला असून, ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी देखील मोठा दावा केला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यामुळे 23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. शिवसेना आणि काँग्रेसचे दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्याबद्दल गौप्यस्पोट केला होता. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वीच उदय सामंत हे शिंदे गटातून वेगळं होणार होते, तेव्हाच शिंदे गटात फूट पडणार होती असं त्यांनी म्हटलं होतं.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आता राहुल शेवाळे यांनी हा दावा केला आहे. 23 तारेखेला राज्यात मोठा भूकंप होणार असून, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात, याचीच कुणकुण लागल्यामुळे संजय राऊत यांनी असं वक्तव्य केल्याचं शेवाळे यांनी म्हटलं आहे.