थंडी आणि पावसाळ्यामध्ये सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे ओले कपडे सुकणं. त्यामुळे कधी कधी रात्रभर कपडे सुकण्यासाठी तसेच बाहेर ठेवावे लागतात. पण कधी लक्षात राहिलं नाही तर तसेही कपडे बाहेरच राहतात.
लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर सुकण्यास मनाई का असते?
कपडे घराबाहेरच्या दोरीवर किंवा खिडकीबाहेर वाळत घालतो. यामध्ये लहान मुलांचे कपड्यांचा देखील समावेश असतो. तुम्ही कधीतरी असं ऐकलं असेल तुमच्या लहान मुलांचे कपडे रात्रीच्या वेळी घराबाहेर सुकत घालू नये. पण नक्की असं का म्हटलं जातं हे तुम्हाला माहितीये का? काही जण याबद्दल अंधश्रद्धा म्हणतात पण यामागे विज्ञानही असतं.
अनेकदा कुटुंबातील वडीलधारी मंडळी लहान मुलांचे कपडे रात्री बाहेर सुकण्यास मनाई करतात. धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा असते. ही उर्जा जी लहान मुलांच्या बाहेर कोरडे पडलेल्या कपड्यांमध्ये जाऊन व्यक्तीच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. मात्र तुम्हाला माहितीये का यामागे विज्ञान देखील आहे.
नकारात्मक ऊर्जेमुळे त्रास होऊ शकतो रात्री लहान मुलांचे कपडे घराबाहेर सुकवू नये, असं अनेक लोक सांगतात. यामागे धार्मिक मान्यतेचा संदर्भ दिला जातो.धार्मिक मान्यतांनुसार, रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा अधिक मजबूत असते. जी कपड्यांद्वारे लहान मुलांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.फक्त धार्मिक नाही विज्ञानात याची बरीच कारणं आहेत.
त्वचेची एलर्जी त्यातील पहिलं म्हणजे रात्रीच्या वेळी दव पडल्याने कपडे सुकण्याऐवजी ओले होतात. कपड्यांमध्ये असलेल्या या आर्द्रतेमुळे, त्या कपड्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू आणि बुरशी वाढू शकते. कपड्यांवर असलेल्या ओलाव्यामुळे अनेक प्रकारचे कीटक, डास रात्री कपड्यांवर बसतात आणि त्यांची अंडी आणि घाण सोडू शकतात. यामुळे मुलाला त्वचेची ऍलर्जी किंवा त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असू शकते.
सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान आवश्यक कपडे नीट सुकण्यासाठी सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान आवश्यक आहे. दुपारी कपडे सुकवण्यासाठी या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होतात. तर रात्री ओलाव्यामुळे कपडे उशिरा सुकतात किंवा थोडे ओले राहतात.अनेक वेळा रात्री अचानक खराब हवामानामुळे धुतलेले कपडे धूळ, चिखल किंवा पावसामुळे घाण होतात आणि खराब होतात. रात्री झोपताना तुम्ही हवामान आणि कपड्यांची काळजी घेऊ शकत नाही. तर दुपारी तुम्ही कपडे आणि हवामान दोन्हीची काळजी घेऊ शकता.