Chandrasekhar Bawankule: महसूल विभागाने शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा

3 hours ago 1

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई () : महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या प्रत्येक कामासाठी निगडीत विभाग आहे. (Revenue department) महसूल विभागाची सर्व समवेशक कामे, सुविधा, योजनांच्या परिणामकारक अंमलबजाणीमुळे जनसामन्यात शासनाची प्रतिमा उंचावली जाते. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात राबविण्यात येत असलेला शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलदगतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिल्या.

महसूल विभाग (Revenue department) अंतर्गत शंभर दिवस घेण्यात येत असलेले कार्यक्रम, योजनांचा आढावा महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतला. मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव अजित देशमुख, धनंजय निकम, सत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, नागरिकांना (Revenue department) महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा connected enactment देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा. यामध्ये जमीन पोर्टल, महाखनिज पोर्टल, आपली चावडी, ई चावडी, अर्धन्यायिक प्रकरणांचा घेता यावा यासाठी e Qj tribunal प्रणालीचा वापर करावा.

महसूल विभागाचे (Revenue department) निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात. नोंदणी व मुद्रांक विभागातील कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजना, उपक्रमांचा आढावा घ्यावा, अशा सूचना महसूल मंत्री बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी बैठकीत दिल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article