टीम इंडियाची युवा ब्रिगेड सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध टी 20I मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना हा 22 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंड या सीरिजमध्ये गेल्या 11 वर्षांपासूनची पराभवाची मालिका खंडीत करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. तर टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही कामगिरी अशीच सुरु ठेवण्यासाठी तयार आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया 11 वर्षांपासून अजिंक्य
टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत गेल्या 11 वर्षांपासून अजिंक्य आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इंग्लंड टीम इंडियाला 2014 नंतर टी 20I मालिकेत एकदाही पराभूत करु शकलेली नाही. त्यामुळे इंग्लंडसमोर यंदा ही पराभवाची मालिका खंडीत करण्याचं आव्हान आहे
इंग्लंडने टीम इंडियाला अखेरीस 2014 साली टी 20I मालिकेत पराभूत केलं होतं. उभयसंघात तेव्हा एकमेव सामना खेळवण्यात आला होता. मात्र तेव्हापासून टीम इंडियाने सलग 4 मालिका जिंकल्या आहेत. टीम इंडियाने 2016-2017, 2018, 2020-2021 आणि 2022 साली इंग्लंडवर टी 20I मालिकेत विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडचा हा गेल्या 11 वर्षांपासूनचा नकोसा इतिहास बदलण्याचा प्रयत्न असणार आहे. इंग्लंडला या प्रयत्नात किती यश येतं? हे पाचव्या आणि अंतिम सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.