Published on
:
20 Jan 2025, 6:12 pm
Updated on
:
20 Jan 2025, 6:12 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'किंग कोहली' या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीने तब्बल १२ वर्षानंतर 'रणजी टॉफी'चा सामना खेळण्यास तयारी दर्शवली आहे. त्याने मानेच्या दुखण्यामुळे २३ जानेवारीपासून होणाऱ्या सामन्यातून आपले नाव मागे घेतले होते. मात्र एका वृत्तानुसार विराट ३० जानेवारीच्या सामन्यात खेळणार आहे.
३० जानेवारीला रेल्वेविरुद्ध दिल्लीचा सामना होणार आहे. या सामन्यात तो दिल्लीच्या बाजूने खेळणार आहे. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, 'विराटने डीडीसीएचे अध्यक्ष (रोहन जेटली) आणि संघ व्यवस्थापनाला आपण रेल्वेविरुद्धच्या सामन्यासाठी खेळण्यास इच्छूक आहे असे सांगितले आहे. कोहली मानेच्या दुखापतीमुळे २३ जानेवारीला सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या आगामी सामन्यात खेळू शकणार नाही, परंतु तो ३० जानेवारीला होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या लीग सामन्यात खेळताना दिसणार आहे.