Published on
:
20 Jan 2025, 5:15 pm
Updated on
:
20 Jan 2025, 5:15 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. (Donald Trump )ट्रम्प यांची ही राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरी टर्म आहे. अमेरिकेत सोमवारी दुपारी १२ वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार सोमवारी रात्री १०.३०) वाजता त्यांनी शपथग्रहण केली. वॉशिंगटन डिसीमधील कॅपिटल रोटूंडामध्ये (अमेरिकन संसद) हा समारोप पार पडला. चार वर्षाच्या अंतराने डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. अमेरिकेच्या इतिहासात १३१ वर्षांनंतर अशा रितीने चार वर्षाच्या कालखंडानंतर ट्रम्प पुन्हा सत्तेत आले आहेत. यापूर्वी २०१७ ते २०२१ या कालखंडात ते अमेरिकेचे ४५ वे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते. (Donald Trump ) यावेळी मावळते राष्ट्रपती ज्यो बायडेन मावळत्या उपराष्ट्रपती कमला हॅरीसही उपस्थित होत्या
उपराष्ट्रपती म्हणून जेडी वेंस यांनी घेतली शपथ
राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून जे डी व्हॅन्स यांनी शपथ घेतली. ते अमरिकेच्या ओहियो राज्याचे प्रतिनिधीत्व करतात.
४० वर्षानंतर अमेरिकन संसंदेच्या सभागृहात शपथग्रहण
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम इनडोअर घेतला गेला. प्रचंड थंडीमुळे हा निर्णय घ्यावा लागला. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच थंडीमूळे असा निर्णय घ्यावा लागला. अमेरिकेच्या संसदभवना बाहेर शपथपविधी समारोप घेतला जातो. पण अमेरिकेची राजधानी वॉशिंगटन डीसी चे सध्याचे तापतान -१२ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आहे. अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वी १८८५ मध्ये रोनाल्ड रिगन यांनीही कॅपीटल रोटुंडा येथे शपथ घेतली होती.
(Donald Trump ) शपथविधीपूर्वी दिली चर्चला भेट
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी वॉशिंग्टन येथील सेंट जोन्स एप्सिकोपल चर्चमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मिलनिया ट्रम्प व कुंटूंबिय उपस्थित होते. वॉशिंग्टनमध्ये १८१५ साली स्थापन झालेले हे सेंट जॉन चर्च वॉशिंग्टनमधील श्रध्देचे प्रतिक आहे. या चर्चची ओळख ‘राष्ट्राध्यक्षांचे चर्च’ अशी तयार झाली आहे.
अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ न्युयॉर्कमधील क्विन्स येथे झाला होता. वडिल फ्रेडरिक क्राईस्ट ट्रम्प सिनियर व माता मैरी ऐनी मॅकलियोड यांच्या पाच अपत्यांपैकी चौथ्या नंबरचे अपत्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प. त्यांची आई स्कॉटलंडमध्ये जन्मली होती व १९३० मध्ये अमरिकेला स्थलांतरीत झाली होती. तर वडील रिअल इस्टेट डेव्हलपर होते.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतीन यांनी दिल्या शुभेच्छा
शपथग्रहण समारोहापूर्वी काही तास अगोदर रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी शुभेच्छा देताना म्हटले आहे की युक्रेण आणि आण्विक हत्यारांसंबधी अमेरिकेच्या नव्या सरकारबरोबर चर्चा करण्यास रशिया तयार असेल.