बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही ऐश्वर्या रायचा बोलबाला आहे. निरागस अभिनय आणि अप्रतिम सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांना जागीच खिळून ठेवण्याची ताकद तिच्याकडे आहे. ऐश्वर्याच्या व्यक्तीमत्त्वात ज्ञान आणि बुद्धिमत्तेचा समन्वय आहे. त्यामुळेच तिला भारतीय सौंदर्याच्या संकल्पनांचे प्रतिकही मानलं जातं. 1994 मध्ये ‘मिस वर्ल्ड’ किताब जिंकणाऱ्या ऐशने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. वय 50 च्या जवळ जात असताना देखील तिच्या चेहऱ्यावर 20 च्या दशकाचा गोडवा दिसतो. म्हणूनच, कुठेही गेल्यावर इतर कलाकारांपेक्षा ऐश्वर्या राय नेहमी वेगळीच दिसते.
आजही तिच्या यौवनाचा गोडवा टिकून आहे. याचं सर्व श्रेय तिच्या त्वचेच्या देखभालीला जाते. तिच्या डोळ्यांमधील चमक आणि सौंदर्य नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्वचेची काळजी घेतानाच, ती तिच्या केसांच्या आरोग्यावरही विशेष लक्ष देत असते. त्यामुळे तिचे चमकदार, मजबूत आणि सुंदर केस प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी विशेष काळजी घेत असते. ऐश्वर्या केसांसाठी नेमकी काय काळजी घेते ते पाहू.
संतुलित आहार आणि तेल
केसांच्या देखभालीसाठी, ऐश्वर्या राय नैसर्गिक तेलांचा वापर करत असते. हे तेल केवळ केस गळणे कमी करण्यासाठीच नाही, तर खराब झालेल्या कडांना सुधारण्यास आणि केसांच्या एकूण आरोग्याला आणि ताकदीला प्रोत्साहन देण्यास मदत करते. हे तेल ती नियमितपणे केसांमध्ये लावत असते. याबरोबरच, तिच्या आहारावर देखील तिचे विशेष लक्ष असते. संतुलित आहार केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
डोक्यांचा मसाज
ऐश्वर्या नेहमी प्रोटीनयुक्त आणि संतुलित आहार घेत असते. त्यासाठी ती जंक फूड टाळते. प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असलेले पदार्थ खाण्यावर तिचा अधिक भर असतो. आरोग्यपूर्ण केसांच्या वाढीसाठी हा आहार अत्यंत फायदेशीर असतो. याशिवाय, ती केस मास्कसुद्धा वापरते. त्याचाही केसांना सुंदर ठेवण्यास फायदा होतो. अवोकाडो, केळी, अंडी इत्यादी घटकांचा वापर करून ती पोषणयुक्त केस मास्क तयार करते. यामुळे केस लांब राहतात आणि चमकही कायम राहते. केसांसाठी ती नारळ तेल आणि ऑलिव्ह ऑईल वापरते. या तेलांमुळे केसांची लांबी आणि घनता वाढते. केस फुटणे थांबवते आणि केसांना मजबूत आणि आरोग्यपूर्ण बनववलं जातं. ऐश्वर्या नियमितपणे तिच्या डोक्याचा मसाज करते. यामुळे डोक्याच्या भागात रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे केसांची देखभाल करण्यात मदत होते.