दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वेने प्रतिनिधींना नेण्यात येणार आहे. संमेलनाचे संयोजक असलेल्या सरहद संस्थेने रेल्वे मंत्रालयाकडे केलेली विशेष रेल्वे देण्याची मागणी मंजूर केली. मात्र ही विशेष रेल्वे असल्याने यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य तिकिटाच्या तीन पट आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची सवलत कोणालाही न देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतल्याने ही सवलत न मिळाल्यास दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी 1500 रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था व महामंडळाने घेतला आहे. संयोजकांना हा भार सोसावा लागणार आहे.
संमेलनासाठी दिल्लीला येणाऱ्या महाराष्ट्रातील साहित्य रसिकांसाठी एका विशेष रेल्वेची संस्थेने मागणी केली होती. पुण्याचे पेंद्रीय मंत्री व संमेलनाचे सरकार्यवाहक मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नाने ही रेल्वे रेल्वे मंत्रालयाने मंजूर झाली असल्याची माहिती सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिली. महाकुंब आणि इतर अडचणी असतानाही या संमेलनासाठी मंत्रालयाने ही रेल्वे मंजूर केली आहे.
z रेल्वे मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची सवलत देणार नाही. दिल्लीला येणाऱ्या साहित्य रसिकांची अडचण होऊ नये यासाठी 1500 रुपये भरून रेल्वे प्रवासासाठी नोंदणी करण्याचा निर्णय संयोजन संस्था व महामंडळाने घेतला आहे. याशिवाय जादा येणारी ही रक्कम मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रायोजकाद्वारे अथवा हितचिंतकांकडून देणगीद्वारे जमा करण्याचे प्रयत्न आहेत. या परिस्थितीत रेल्वे अंतिम मान्यतेचे पत्र आल्यावर तातडीने एकूण रक्कम भरण्याचा निर्णय संयोजक संस्थेने घेतला आहे. ही नोंदणी सरहद कार्यालय आणि साहित्य परिषद कार्यालय येथे करता येईल.
z 17 डबे असलेली ही रेल्वे पूर्णपणे स्लीपर क्लास आहे. ही विशेष रेल्वे 19 फेब्रुवारीला पुण्यातून निघेल आणि दि. 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचेल. परतीचा प्रवास 23 फेब्रुवारी रोजी रात्री सुरू होईल. 24 तारखेला पुण्यात पोहोचेल. ही विशेष रेल्वे असल्याने यासाठी भरावी लागणारी रक्कम सामान्य तिकिटाच्या तीन पट आहे. यामध्ये सवलत देण्याबाबत माजी पेंद्रीय मंत्री शरद पवार आणि पेंद्रीय मंत्री व संमेलनाचे सरकार्यवाहक मुरलीधर मोहोळ हे आग्रही आहेत. त्यामुळे काही सवलत मिळण्याची शक्यता आहे.