अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील इमारतीतील घरात घुसून एका चोराने त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे त्याच्यावर 4-5 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरी केल्यानंतर डॉक्टरांनी सैफच्या पाठीतून चाकूचा एक तुकडाही काढला. आता सैफची प्रकृती बरी असून आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसलेल्या आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहील्ला अमीन फकीर उर्फ मोहम्हद शहजादला अटक केली.
तो मूळचा बांगलादेशचा रहिवासी असून भारतात तो विजय दास नावाने रहात होता. याच आरोपीबद्दल आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने मोहम्मद हा बांगलादेशमधून भारतात आल्यानंतर काही काळ पश्चिम बंगालमध्ये रहात होता, तसेच तेथे रहात असताना सिमकार्ड खरेदी करण्यासाठी त्याने बनावट आधारकार्डही खरेदी केले होते, अशी माहिती समोर आली आहे. तिथून आधारकार्ड बनवून घेतल्यानंतर त्याने सिमकार्ड खरेदी केले आणि त्यानंतर मुंबईला आला. आरोपी मोहम्मदने खुखुमोनी जहांगीर शेख या नावाने सिमकार्ड घेतले होते . तो बांगलादेशमधून मेघालयमधल्या डावकी नदी ओलांडून पश्चिम बंगालमध्ये आला अशी माहिती समोर आली आहे.
बांगलादेशमध्ये केले बरेच कॉल
मुंबईत आल्यानंतर येथील अमित पांडे नावाच्या इसमाने त्याला शहरात कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचेही समोर आले आहे. सैफवरील हल्ल्यानंतर तीन दिवसांनी रविवारी पोलिसांनी त्याला अटक केली, त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा तो कोलकाता येथील रहिवासी असल्याचे त्याने प्रथम सांगितलं होतं. मात्र पोलीसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले असता आरोपी मोहम्मदने त्याने बऱ्याच बांगलादेशी नंबरवर कॉल केले असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची कागदपत्रे मागवली असता त्या कागदपत्रांनुसार तो बांगलादेशी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. एवढेच नव्हे तर सैफवर ज्या रात्री हल्ला केला, त्यानंतर आरोपीन तेथून पळ काढला, नंतर तो सैफच्या इमारतीच्या गार्डनमध्येच लपून बसला आणि तेथेच झोपला होता, असेही समोर आले आहे.
इमारतीतील गार्ड ज्या हाऊसकिपींगचे कर्मचारी, त्यांच्याकडे लायसन्सच नाही
याप्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैफ अली खान हा कुटुंबियांसह वांद्रयाच्या सद्गुरू शरण इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतो. मात्र या इमारतीत बंदोबस्तला असणारे गार्ड हे हाऊसकिपिंग एजन्सीचे असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सिक्युरिटी पुरवण्याचे लायसेन्स नसलेल्या कंपनीने हे गार्ड पुरवले होते असे समोर आले आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांना कामगाराच्या बॅकग्राउंडची फारशी कल्पना नसते शिवाय त्यांच्याशी सबंधित कागदपत्रेही नीट जमा केलेली नसतात. कंपनीला काम दिल्यानंतर सोसायटी त्यामध्ये फारसा हस्तक्षेप करत नाही असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने गेटवर कुठलेही रजिस्टर मेंटेन केलेलं नव्हतं असाही दावा कंपनीने केला असून पोलीस त्याची पडताळणी करत आहेत.
बांग्लादेशींना भारतात वाढती मागणी
स्वत: कामगारांच्या वाढत्या मागणीमुळे बांग्लादेशींना भारतात वाढती मागणी असल्याचे समोर आले आहे. भारतात उत्तरप्रदेश बिहार किंवा ओडिसाचे कामगार दिवसाचे 700 ते 800 रुपये घेतात. मात्र त्या तुलनेत बांग्लादेशी हे काम मिळवण्यासाठी 400 ते 500 रुपये घेतात. बांग्लादेशातील राजकीय अस्थिरता, बेरोजगारी यामुळेच या बांग्लादेशींचा मोर्चा आता भारताकडे वळला आहे. कन्स्ट्रक्शन साईडटरील मजूर, वाचमेन, हेल्पर, स्विपर यासारख क्लास4 ची कामे हे मजूर करतात. भारतात राहूनच यापूर्वी आलेल्या बांग्लादेशींच्या मदतीने ते आपले मतदान ओळखपत्र, आधारकार्ड इतर कागदपत्र बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या स्थलांतरीत बांग्लादेशीवर नियमित कारवाई जरी होत असली, तरी प्रत्यक्षात परिसरात भाड्याने राहणार्यांची ज्या नियमीततेने चौकशी करायला हवी त्या अनुशंगाने पोलिस चौकशी करत नाहीत असेही समोर आले आहे.