Manikrao Kokate connected One Rupees Crop Insurance : लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी महिलांची नावं कमी होण्याचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच पीक विमा योजनेवरून वाद पेटला आहे. काय म्हणाले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे?
पीक विमा योजना बंद होणार?
1 रूपयांत पीक विमा योजनेवर संकटाचे ढग जमा झाले आहे. सध्या राज्यात लाडकी बहीण योजना, पालकमंत्री पद, बीडमधील घटना आणि आता पीक विमा योजनेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या योजनेत बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले. त्यानंतर या योजनेलाच घरघर लागण्याची भीती व्यक्त होत आहे. एक रुपयांत पीक विमा योजनेत बदल करून शेतकऱ्यांना आता एक रुपयांऐवजी 100 रुपये भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केल्याने एकच खळबळ उडली आहे. एक रुपयांत पीक विमा योजना बंद होणार का? असा सवाल विचारण्यात येत आहे.
बातमी अपडेट होत आहे…