सोमवारी (दि. 20) पहाटे चारच्या सुमारास हा नर बिबट्या पिंजर्यात अडकला. वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला ताब्यात घेतले. विशेषतः जाधव वस्तीत सोमवारी आणखी एका बिबट्याच्या हालचाली दिसून आल्या, ज्यामुळे ग्रामस्थ अधिक सतर्क झाले आहेत. वनपाल शिंदे यांच्या मते, या भागात अजून एका बिबट्याच्या उपस्थितीची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच दुसर्या पिंजर्याची व्यवस्था केली जाईल. त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामपंचायत सदस्य श्यामकांत ढोराजकर, अतुल दुर्गे, चेअरमन श्रीधर साळुंके, जे. आर. काळे, शांतीलाल होळकर, आप्पाराव काळे, रवींद्र थोरात, गजेंद्र थोरात, अशोक काळे, शैलेंद्र काळे, प्रदीप काळे, सागर काळे, एच. के. काळे, शिवराम काळे, जालिंदर काळे, दगडू हिंगे आणि विजय कोळपे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी परिसरात अजूनही बिबट्यांचे दर्शन होत असल्याचे सांगितले. त्यामुळे वनपाल शिंदे यांच्यासोबत लवकरच गावपातळीवर बैठक आयोजित करण्याचे ठरवले आहे.
आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत. जाधव वस्तीवर ऊसतोड चालू आहे. त्यांना येणार अडथळा तात्पुरता दूर करू. दोन दिवसाने पिंजरा बसवला जाईल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी गाव बैठक घेऊ.
भानुदास शिंदे, वनपाल