शेगाव (Shegaon) : तालुक्यातील 11 गावांमध्ये झालेल्या केसगळती आजारग्रस्त नागरीकांच्या डोक्यावर केस पुन्हा परत येत असून सदरचा आजार हा कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदरचा आजार हा संसर्गजन्य (Infectious) नाही हे सिध्द झाले आहे. त्यामुळे सदरच्या रुग्ण संख्येत वाढ होत नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळाले असल्याचे दिसत आहे.
20 जानेवारी पर्यंत रुग्णांची (Patient) संख्या ही 204 वर गेली असून शेवटी माटरगांवात 3 रुग्ण निघाल्याची माहिती मिळाली आहे. केस गळतीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बाधित व्यक्तींच्या (Affected Person) डोक्यावर आता केस परत उगवत असल्याचे निरीक्षण आयुष मंत्रालयाच्या तज्ञ पथकाने नोंदवले आहे. विशेष म्हणजे डोक्यावरील केस गळत (Hair Loss) असले तरी बाधित पुरुषांच्या चेहरा आणि छातीवरील केस अबाधित असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. मिलींद सुर्यवंशी यांनी दिली.
तज्ञांच्या निरीक्षणानुसार बाधितांमध्ये फंगल (बुरशी) वाढ दिसून आली असून डोक्यावर खाज येण्याची समस्याही समोर आली आहे. तीन दिवसांच्या पाहणी दौऱ्यानंतर आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी तज्ञांचे पथक (Homeopathy Expert Team) परतले आहे. होमिओपॅथी तज्ञ डॉ. सौदागर व जे. जे. हॉस्पिटल मुंबईच्या (J. J. Hospital Mumbai) होमिओपॅथी आणी युनानी पथकाने पहूरजीरा गावात तपासण्या केल्या. तसेच निरीक्षणे केली. कोणते संशोधन हाती घेतले आणि कोणते उपचार दिले याबाबत माहिती दिली. आयसीएमआर व विविध आरोग्य विभागातील चमुंनी रक्तांचे, पाण्याचे, मासाच्या तुकड्यांचे रिपोर्ट पुणे, नागपूर, अकोला येथे तपासणी करीता पाठविले असून येत्या 2-4 दिवसांत रिपोर्ट आल्यानंतर रोगांवर 100 टक्के नियंत्रण मिळणार आहे.
निरीक्षण व नमुने संकलन
पथकाने 5 प्रमुख गावांतील 42 बाधित व्यक्तींची तपासणी करून त्यांच्या दिनचर्या, आहार तसेच अन्नधान्याचा स्त्रोत यासंबंधी नोंदी घेतल्या. काही नमुनेही तपासणीसाठी संकलीत करण्यात आले आहेत. बाधितांना एका महिण्याचे औषध (Medicine) देण्यात आले आहे.
पुढील महिन्यात पथक पुन्हा भेट देणार आहे. पथकाने तपासणी (Inspection) केली असता परत उगवणाऱ्या केसांमध्ये स्थैर्य असल्याचे आढळून आले. ओढल्यानंतर हे केस गळुन पडले नाहीत. परंतु नव्याने केस उगवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतही नमुने घेण्यात आले आहे.
तालुक्यातील नागरीकांचे सर्व व्यवहार सुरळीत- सरपंच रामा थारकर पाटील
बाधित 11 गावातील नागरीकांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून सलून पासुन ते किराणा माल आणि जिवनाश्यक वस्तू पूर्ववत विकल्या जात आहे. मध्यंतरी तालुक्यात नागरीकांना बाधित ह्या हेतुने दूर केल्या जात होते, अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र त्या सर्व अफवा असून केस पुन्हा उगवत असल्यामुळे आणि आजारावर नियत्रंण आल्यामुळे जनजीवन पूर्ववत होत असल्याची प्रतिक्रिया बोडगांव सरपंच रामा थारकर पाटील यांनी दिली आहे.
आजार संसर्गजन्य नाही; परिस्थिती नियंत्रणात!
होमीओपॅथी, युनानी पथकाचे योगदान
होमिओपॅथी आणि युनानीच्या राज्यस्तरीय पथकानेही बाधित गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण (Survey) केले. त्यांनी बाधित व्यक्तींच्या आरोग्यविषयक संपूर्ण माहितीची नोंद घेतली व आवश्यक नमुने संकलित केले. केंद्रीय अनुसंधान परिषद, आयुष मंत्रालयातंर्गत (Ministry of AYUSH) होमिओपॅथी क्षेत्रीय संस्थेच्या तेजस्विनी पाटोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही या तपासणीत सहभाग घेतला.
गावनिहांय आकडेवारी
3 प्राथमीक आरोग्य केंद्र (Primary Health Center) भोनगांव, जवळा बु., जलंब त्या अंतर्गत येणारी 11 गांवे भोनगांव अंतर्गत बोंडगांव-24, कालवड-24, कठोरा-30, भोनगांव-10, मच्छिन्द्रखेड-13 तर जवळा बु. अंतर्गत हिंगणा-5, घुई-11, तरोडा कस्बा-13 तर जलंब अंतर्गत येणारी गांवे पहुरजिरा- 37, माटरगांव बु-27, निंबी-10 असे एकुण 204 लाभार्थी संख्या झाली आहे.