पंढरपूर : आंदोलनाप्रसंगी किरण आटकळे, पिंटू मोरे, माऊली काळे, धनंजय लकडे आदी.Pudhari Photo
Published on
:
22 Jan 2025, 1:15 am
Updated on
:
22 Jan 2025, 1:15 am
पंढरपूर : सामाजिक कार्यकर्ते बापू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंढरीतील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायामशाळेसमोर बीड जिल्ह्यातील खंडणीच्या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी वाल्मीक कराड याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मीक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करावा, त्याचे पंढरपुरात दोन वाडे आहेत. तसेच राज्यातील इतर भागातही कोट्यवधींची माया जमा केली आहे. त्याची ही सर्व संपत्ती शासनाने शासनजमा करून घ्यावी. ज्या पद्धतीने सरपंच संतोष यांची क्रुरपणे हत्या केली, ती पाहता बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड व त्याचे साथीदार हे माणसाच्या नावाला कलंक ठरत आहेत. या सर्वांना तातडीने फाशी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी बापू शिंदे यांनी केली आहे.
यावेळी शेगाव दुमालाचे सरपंच किरण आटकळे, पिंटू मोरे, माऊली आबा काळे, धनंजय लकडे, नागेश जाधव, बंटी परचंडे, पवन खंडागळे, माऊली नायको यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.