पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत, हे लोक या महाराष्ट्राचा कारभार बघणार का ? आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली, स्वत:ही फुटलेत. हे अस्वस्थ आत्मे आहेत. पवार साहेबांना भटकता आत्मा यांनी म्हटलं पण हे स्वत:च लटकते आणि भटकते आत्मा आहेत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील नेत्यांवर निशाणा साधला. पालकमंत्रीपदावरून राज्यातील नेत्यांमध्ये नाराजीचं राजकारण सुरू आहे. शिंदे गटातील काही नेत्यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असून त्यामुळेच ते दरे गावी गेल्याचे बोलले जात होते. त्या मुद्यावरून संजय राऊत यांनी शिंदे आणि एकूणच महायुतीमधील नेत्यावंर टीकास्त्र सोडलं. कुठेतरी समाधाना माना, ज्या ईव्हीएमने तुम्हाला एवढा मोठा विजय दिला, त्याचं समाधान माना, महाराष्ट्राची प्रतिमा सांभाळा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
दावोसमध्ये बसून तुम्ही पुन्हा पक्ष फोडण्याची भाषा करत आहात, लाज कशी वाटत नाही तुम्हाला ? मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमच्या आमदार-खासदारांची भूमिका असल्याचे सांगत संजय राऊतांनी महायुतीतील नेते उदय सामंत नेत्यांवर हल्ला बोल चढवला. ज्यांना जायचं ते बेईमान शेण खायला गेले यांच्यासोबत, पण आम्ही कशाला जाऊ ? आम्हाला या मराठी मातीचा स्वाभिनमान आहे, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलंय त्याचा आम्हाला अभिमान आहे.
उदय सामंत यांना मुख्यंत्र्यांनी ताबडतोब दावोसमधून महाराष्ट्रात पाठवावे. तिकडे ते काय करत आहेत ? तिथे ते शिंद्यांचेच आमदार फोडायला गेले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
ही बातमी अपलोड होत आहे.