इमारतीच्या पार्किंगमध्ये कार लावण्याच्या वादातून साेसायटीतीलच इतर रहिवाशांमध्ये झालेल्या वादात साेसायटीच्या चेअरमनसह इतर सदस्यांनी केलेल्या मारहाणीत एका रहिवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील हिरावाडी परिसरात घडली. मंगळवारी (दि. 21) सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून पंचवटीपोलिस ठाण्यात साेसायटीच्या चेअरमनसह इतर सदस्यांविराेधात सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील हिरावाडी परिसरातील दामाेदरनगर भागात श्री केशवहरी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅॅटनं. 8 मध्ये राहणारे व्यावसायिक बुधल लक्ष्मण विश्वकर्मा (46) यांचा या मारहाणीत मृत्यू झाला. विश्वकर्मा यांच्या फ्लॅटसमोरील 9 नंबरच्या फ्लॅटमध्ये जाधव नामक रहिवासी राहतात. साेमवारी रात्री 10.30च्या सुमारास इमारतीच्या वाहन तळावरकार लावण्यावरून जाधव व विश्वकर्मा कुटुंबियांत वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हा प्रकार बघून साेसायटीचे चेअरमन वसंत घाेडे व इतर सदस्यांनी विश्वकर्मा यांना ‘तुमचा नेहमीचा त्रास आहे’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर विश्वकर्मा यांनीही शिवीगाळ केल्याने चेअरमनसह इतर सदस्यांनी त्यांना मारहाण केली. यात संशयितातील एका सदस्याने पीव्हीसीपाइप डोक्यात मारल्याने विश्वकर्मा गंभीर जखमी झाले. कुटुंबियांनी विश्वकर्मा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रवेशद्वारावरच विश्वकर्मा यांना चक्कर आल्याने त्यांना अपघात विभागात दाखल केले असता डाॅक्टरांनी तपासत मृत घोषित केले. याप्रकरणी विश्वकर्मा यांच्या मुलाने मंगळवारी पहाटे जिल्हा रुग्णालयातील पोलिसांना याबाबत माहिती दिली. चेअरमनसह 6 सदस्यांविराेधात गुन्हा दाखल पंचवटी पोलिसांना घटना समजताच त्यांनी केशवहरी अपार्टमेंटमधील रहिवाशांचे जबाब घेतले. विश्वकर्मा यांच्या पत्नी व मुलाच्या तक्रारीनुसार चेअरमनसह सहा सदस्यांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात पोलिसांनी संशयित वसंत घाेडे, विशाल घाेडे, गणेशघाेडे यांच्यासह सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. विश्वकर्मा कुटुंबातील सदस्यांचा आक्राेश बुधल विश्वकर्मा यांना त्यांच्या पत्नी व मुलासमाेर मारहाण झाल्याने त्यांनी एकच आरडाओरड केली. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे निधन झाल्याचे समजताच पत्नीने हंबरडा फाेडला. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले असा परिवार आहे. माेठामुलगा त्यांच्या फर्निचरच्या व्यवसायात त्यांना हातभार लावत असून काहीदिवसांपूर्वीच त्यांची आर्थिक घडी बसली हाेती.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)