मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोक्काचा गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मीक कराडला बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाढीव कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सीआयडीने कराडच्या कोठडीचा अधिकार अबाधित ठेवला आहे. त्यामुळे गरज पडल्यास सीआयडी कराडच्या कोठडीची मागणी करू शकते.
वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, विष्णू चाटेलाही दिली जेल चॉइस; दमानियांचे गंभीर आरोप