हिंदू धर्मात वास्तुशास्त्र केवळ दिशानिर्देशनाचे महत्त्व सांगत नाही तर एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील नियमानबद्दल देखील सांगते. आपल्या समाजात अनेकांना अशी सवय असते की ते इतरांकडून वस्तू घेतात आणि त्या वापरतात. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अशा प्रकारे इतरांच्या वस्तू घेणे आणि देणे अशुभ मानले जाते. जे लोक इतरांकडून वस्तू घेतात आणि स्वतः वापरतात त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. माणसाच्या आत नकारात्मक ऊर्जा प्रवेश केल्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा काही लोक एकमेकांच्या वस्तूंची देवाण-घेवाण करतात. तेव्हा एकमेकांची ऊर्जा देखील त्यांच्यामध्ये प्रवेश करते. या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला अनेक नवीन समस्यांना सामोरे जावे लागते. वास्तुशास्त्रानुसार अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवाण-घेवाण करणे टाळल्या पाहिजे ते जाणून घेऊ.
दागिन्यांची देवाण-घेवाण
पूजा, धार्मिक कार्यक्रम, लग्न या समारंभामध्ये अनेक महिला त्यांच्या कपड्यांची जुळणारे दागिने घालतात. मात्र ते आपल्याकडे नसल्यास दुसरे कोणाचे तरी घेऊन ते घालतात. वास्तुशास्त्रात दुसऱ्याचे दागिने घेऊन ते घालणे निशिद्ध मानले गेले आहे. याचा ग्रहांवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे परिधान करणाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात.
हे सुद्धा वाचा
मीठ
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर मीठ कधीही कोणाला देऊ नये किंवा कोणाकडून ते घेऊ नये. वास्तुशास्त्रानुसार कोणाला मीठ दिल्यास घरातून सुख-समृद्धी निघून जाते.
बूट चप्पल बदलणे
वास्तुशास्त्रात बूट आणि चप्पल यांची देवाण-घेवाण करणे अशुभ मानले जाते. दुसऱ्याचे बूट किंवा चप्पल कधीही घालू नये. जे लोक दुसऱ्याचे बूट आणि चप्पल घालतात त्यांच्या आयुष्यात गरिबी येते. तसेच इतरांची नकारात्मक ऊर्जा देखील स्वतःमध्ये शोषली जाते.
कंगवा
अनेक जण इतरांनी वापरलेला कंगवा वापरतात. पण या सवयीमुळे आरोग्याला नुकसान होतेच पण त्यासोबतच ती वस्तू असणाऱ्याची नकारात्मक ऊर्जा येते.
पेन आणि पुस्तकाची देवाणघेवाण
पुस्तक आणि पेन यातून ज्ञान मिळते. वास्तुशास्त्रानुसार कधीही पुस्तक कोणाला देऊ नये. पुस्तक दिल्याने ज्ञान मिळवण्यास अडथळे निर्माण होतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)