परभणी (Parbhani):- शहर महापालिका प्रभाग समिती अ च्या पथकाने मंगळवार २१ जानेवारी रोजी प्लास्टीक (Plastic) बंदी मोहिम राबविली. या मोहिमेत ३० किलोचे पाच प्लास्टीक बॅग बॉक्स, चहाचे कप जप्त करण्यात आले. तसेच १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेच्या पथकाची कारवाई
प्रभाग समिती अ च्या पथकाने सदर मोहिमेअंतर्गत आठ दुकानांची तपासणी केली. एक दुकान मालकावर कारवाई करत प्लास्टीक, चहाचे कप जप्त करण्यात आले. तसेच १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मनपा प्रशासक धैर्यशिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रज्ञावत कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विकास रत्नपारखे, लक्ष्मण जोगदंड, कुणाल भारसाकळे यांच्या पथकाने केली. महापालिका (Municipality) आयुक्त धैर्यशिल जाधव यांनी प्लास्टीक कॅरिबॅग, चहाचे कप वापरु नयेत असे आवाहन केले. पर्यावरण संरक्षण तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातुन प्लास्टीकचा वापर टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.