Published on
:
22 Jan 2025, 12:42 pm
Updated on
:
22 Jan 2025, 12:42 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जारी केलेल्या सर्व 'जर्सी मार्गदर्शक तत्त्वांचे' पालन करेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजीत सैकिया यांनी बुधवारी पीटीआयला ही माहिती दिली आणि संघाच्या अधिकृत जर्सीवर यजमान पाकिस्तानचे नाव लिहिण्यास बोर्डाने आक्षेप घेतल्याचे वृत्त फेटाळून लावले.
19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे. भारताने सुरक्षेच्या कारणास्तव आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. टीम इंडियाच्या सर्व लढती दुबईमध्ये रंगणार आहेत.