टीम इंडियाने इंग्लंडला ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या टी 20I सामन्यात ऑलआऊट केलं आहे. टीम इंडियाने इंग्लंडला 132 धावांवर गुंडाळलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 133 धावांचं आव्हान मिळालं आहे. इंग्लंडने कर्णधार जोस बटलर याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 132 धावा केल्या. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय ठरवला आणि इंग्लंडला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे इंग्लंडची नाजूक स्थिती झाली. मात्र कर्णधार जोस बटलर याने अर्धशतक करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. भारतीय गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख पार पाडलीय. आता टीम इंडियाचे फलंदाज हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करतात? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.