सर्दीचे दुखणे अंगावर काढल्याने श्वसनाचा त्रास वाढल्याने एका युवकाचा उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला.
Published on
:
22 Jan 2025, 5:15 pm
Updated on
:
22 Jan 2025, 5:15 pm
गेवराई : सर्दीचे दुखणे अंगावर काढल्याने श्वसनाचा त्रास वाढल्याने एका युवकाचा उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२१) मध्यरात्रीनंतर दिडच्या सुमारास गेवराईतील जातेगावात घडली. विजय मधुकर धोंडरे (वय २२, रा.जातेगाव, ता. गेवराई बीड) असे या युवकाचे नाव आहे.
विजयला सोमवारी सर्दी झाली होती याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यानंतर काही वेळाने त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला बीडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मंगळवार मध्यरात्रीनंतर त्याला श्वसनाचा त्रास अधिक जाणवू लागला. यादरम्यान ऑक्सिजनची पातळी खालवल्याने त्याचा मृत्यू झाला.