शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड असून या काळात गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी-विक्री करत असतात. आज शेअर बाजाराचा निफ्टी 320 अंकांच्या घसरणीनंतर 23025 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 1235 अंकांनी घसरून 75838 च्या पातळीवर बंद झाला. दरम्यान, गुंतवणूकदारांचे सुमारे 7 लाख कोटींचे नुकसान झाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला काय आहे? अर्थसंकल्पापूर्वी मार्केट एक्सपर्ट काही शेअर्सची नावे सांगितली आहेत ज्यात तुम्ही बजेट 2025 पूर्वी गुंतवणूक करू शकता. चला जाणून घेऊया.
संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी का?
अर्थसंकल्प 2025 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी अनेक सकारात्मक ट्रिगर आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद होईल आणि निर्यातीसाठीही उत्साह निर्माण होईल, अशी आशा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ‘बीईएल’ ही संरक्षण क्षेत्रातील चांगली कंपनी असून, थोडी घसरण झाल्यानंतर ही चांगली संधी आहे, असं मत तज्ज्ञांचं आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात 27 टक्के परतावा दिला आहे. अर्थसंकल्पात सरकारने संरक्षणासाठी केलेल्या अधिक तरतूदीचा परिणाम या कंपनीच्या शेअर्सवर दिसून येतो. आता गुंतवणूक केल्यास काही आठवड्यांत चांगली कमाई होऊ शकते.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही कंपनी विमाने आणि हेलिकॉप्टरची निर्मिती करते. यासोबतच लढाऊ विमानांचे असेंबलिंग आणि देखभालीचे कामही करते. या कंपनीने अशी अनेक विमाने बनवली आहेत, जी पूर्वी केवळ आयात केली जात होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट. मोदी सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत संरक्षण उपकरणे देशातच तयार करण्यावर भर देण्यात आला आणि त्याचा फायदा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीला झाला आहे. कंपनीचे ऑर्डर बूक खूप मजबूत आहे.
बीईएल शेअर
बीईएल शेअरच्या किंमतीत सध्या किंचित घसरण दिसून येत असून तो 280 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.
टाटा पॉवर शेअर
ऊर्जा क्षेत्र आकर्षक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. टाटा पॉवरचा शेअर घेण्याचाही सल्ला देतात. सध्या टाटा पॉवरचा शेअर 368 रुपयांच्या आसपास व्यवहार करत असून तोही दीड टक्क्यांहून अधिक घसरला आहे.
बँकिंग क्षेत्र
बँकिंग क्षेत्राविषयी बोलताना तत्ज्ञ सांगतात की, बंधन बँकेबद्दल सांगितले की, जर तुमच्याकडे जोखीम सहन करण्याची क्षमता असेल तर तुम्ही येथे गुंतवणूक करू शकता, परंतु काही तिमाहीत थोडी अस्थिरता येऊ शकते. सिटी युनियन बँकेचे अपडेट्स अतिशय सकारात्मक असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)