Published on
:
22 Jan 2025, 5:30 pm
Updated on
:
22 Jan 2025, 5:30 pm
अकोला : नजिकच्या काळात निवडणूक होणाऱ्या 20 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात आज काढण्यात आली. सोडतीनुसार निश्चित आरक्षणाची माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जाहीर केली आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायती व आरक्षणात तेल्हारा– उमरी (अनुसूचित जाती महिला), अकोली रूपराव (सर्वसाधारण), अकोट- केळपाणी (अनुसूचित जमाती महिला), केळपाणी बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), मूर्तिजापूर- कव्हळा (अनुसूचित जमाती महिला), शेलू बाजार (सर्वसाधारण महिला), किनखेड (सर्वसाधारण महिला), लंघापूर (सर्वसाधारण).
बाळापूर- हिंगणा निंबा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), शिंगोली (सर्वसाधारण), बार्शिटाकळी- भेंडीसूत्रक (सर्वसाधारण महिला), चोहोगांव (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), पातूर- सांगोळा (सर्वसाधारण महिला), कोठारी बु. (सर्वसाधारण), आस्टुल (सर्वसाधारण महिला), भंडारज बु. (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), तुलंगा बु. (सर्वसाधारण), अकोला-आखतवाडा (सर्वसाधारण स्त्री), अनकवाडी (अनुसूचित जाती), मजलापूर (सर्वसाधारण) या गावांच्या सरपंचपदाच्या आरक्षणाचा समावेश आहे.