तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याबाबत 'शहर महाविकास आघाडी'चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Published on
:
22 Jan 2025, 5:39 pm
Updated on
:
22 Jan 2025, 5:39 pm
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरातील गाभाराच्या दुरुस्तीबाबत तुळजापुर शहर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२२) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तुळजाभवानी देवीचा गाभारा अतिशय शास्त्रशुध्द आणि शास्त्रानुसार झालेला असून याच्यात कुठलाही बदल होऊ नये. असाच एक प्रकार सुधारणेच्या व विकासाच्या नावाखाली झाला होता. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्यास बाधा पोहचली आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
तसेच या निवेदनाची दखल न घेतल्यास तुळजापुर महाविकास आघाडी व सर्व घटक पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी अमोल कुतवळ, अमर मगर, शाम पवार, अमर भैया मगर, अक्षय कदम, नरेश पेंदे, भरत जाधव, नवनाथ जगताप याच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.