हिंगोली (Ram Mandir) : अयोध्या येथील राम मंदिर उभारणीनंतर प्रभू श्रीराम चंद्रांच्या मूर्ती स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागातील प्रभू श्रीरामच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी हिंगोली शहरातून ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढत प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने हिंगोली नगरी दुमदुमली होती.या शोभायात्रेत हजारो महिला व रामभक्त सहभागी झाले होते.
अयोध्या येथील राम मंदिर उभारल्यानंतर प्रथमच हिंगोली येथे (Ram Mandir) प्रभू श्रीराम चंद्राच्या मूर्तीला एक वर्ष पुर्ती झाल्याने हिंगोलीतील रिसाला बाजार भागातील श्रीराम मंदिरापासून भाविक भक्तांच्या व रामभक्तांच्या वतीने २२ जानेवारी रोजी आयोध्यातील मूर्ती स्थापनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीराम मंदिरात सकाळी महाआरती व दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता गणेशवाडी प्राथमिक शाळेसमोर प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. ही शोभायात्रा वीर सावरकर चौकातून मारवाडी गल्लीसह इतर भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत (Ram Mandir) प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने हिंगोली परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर ही शोभायात्रा विविध भागातून ढोल ताशाच्या गजरात येत पुन्हा राम मंदिरात विसर्जित करण्यात आली.या शोभायात्रेत हजारो महिला, पुरुष सहभागी होणार झाले होते.
श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा :अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी (Ram Mandir) श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठानला एक पुर्ण झाले असून त्यानिमित्ताने हिंगोली शहरातील धडवाई हनुमान मंदिर येथे महा आरती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार गजाननराव घुगे, सावरमल आग्रवाल, दिपक निमोदीया, राजेंद्र हलवाई, राजू वसीया, कैलास श्रीनाथ, रुपेश मुदिराज बाबा घुगे, प्रदिप धडवाई महाराज, विशाल करवंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या शोभायात्रेनंतर भाविकभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा हजारो महिला व भाविक भक्तांनी घेतला.