प्रातिनिधीक फोटोFile Photo
Published on
:
22 Jan 2025, 6:07 pm
Updated on
:
22 Jan 2025, 6:07 pm
बांबवडे पुढारी वृत्तसेवा : वारणा कापशी ता शाहूवाडी येथे रानडूकराच्या हल्यात तरूण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रामचंद्र नामदेव कदम वय ४० असे जखमी तरुणाचे नाव असून ही घटना कापशी मलकापूर रोडवर असणाऱ्या वारणा कॉलनी भागात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र कदम हे जनावरांसाठी ऊसाचे वाडे तोडत असतांना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या डुकराने कदम यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी मलकापूर रुग्णालयात दाखल केले आहे. सदर भागात या अगोदर दोन कुत्र्यांना रानडूकरानी ठार केले आहे. या घटनेमुळे लोकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.