पूर्णत रिडिझाइन केलेले इंजिन, चेसिस, बॉडीवर्क, डिझाइन आणि स्टोरेज कन्सेप्टने सुसज्ज
नवी दिल्ली (BMW R) : नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस ॲडव्हेंचर भारतात लाँच करण्यात आली आहे. ही ॲडव्हेंचर मोटरसायकल कम्प्लीटली बिल्ट-अप युनि (सीबीयु) म्हणून उपलब्ध असेल आणि डिलिव्हरीजना एप्रिल 2025 पासून सुरूवात होईल. विक्रम पावाह, प्रेसिडण्ट व सीईओ, बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया म्हणाले, “नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस ॲडव्हेंचर मोठ्या अॅडव्हेंचर मोटरसायकल्सच्या विश्वामधील नवीन बेंचमार्क आहे. नवीन ॲडव्हेंचर जीएस, सर्वात मोठ्या ट्रॅव्हलेण्ड्युरोजच्या पोर्टफोलिओमधील अद्वितीय आधारस्तंभ आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून फ्लॅट ट्विन बॉक्स इंजिन असलेली मोठी बीएमडब्ल्यू जीएस ॲडव्हेंचर लांब पल्लाच्या मोटरसायकल प्रवासाशी संलग्न राहिली आहे.
ऑटोमेटेड शिफ्ट असिस्टण्ट (एएसए) ने युक्त, जे अधिक उत्साहवर्धक राइडिंगसाठी देते पूर्णत ऑटोमेटेड क्लच ऑपरेशन
या मोटरसायकलमध्ये प्रमाणित इक्विपमेंटची व्यापक श्रेणी आहे, जी अत्यंत वैयक्तिकृत आहे आणि तुम्हाला मर्यादित मोटरसायकल अनुभव देते. नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस ॲडव्हेंचर लीजेण्ड असण्यासोबत साहसी राइडिंगसाठी स्टेटमेंट देते. ही मोटरसायकल रॉक सॉलिड आहे.” नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस ॲडव्हेंचरची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत पुढील किमतीपासून सुरू होते.
नवीन बॉक्सर इंजिनसह बॉटम माऊंटेड ट्रान्समिशन आणि बीएमडब्ल्यू शिफ्टकॅम टेक्नॉलॉजी
इन्वॉइसिंगच्या वेळी अस्तित्वात असलेली किंमत लागू होईल. डिलिव्हरी एक्स-शोरूममधून होतील. एक्स-शोरूम किंमती (जीएसटी व कम्पेन्सेशन सेससह) लागू होतील परंतु त्यात रोड टॅक्स, आरटीओ स्टॅट्युअरी टॅक्स/फीज, इतर लोकल टॅक्स/सेस लेव्हीज आणि इन्शुरन्स या गोष्टी त्यातून वगळल्या जातील. किमती आणि पर्याय पूर्वसूचनेशिवाय बदलणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी कृपया स्थानिक ऑथोराइज्ड बीएमडब्ल्यू मोटोर्राड डिलरशी संपर्क साधावा. नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस ॲडव्हेंचर पुढील आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – रेसिंग रेडमध्ये बेसिक व्हेरिएण्ट, ऑप्शनल स्टाइल्स – ट्रिपल ब्लॅक ब्लॅकस्टॉर्म मेटालिक पेंटवर्कमध्ये उपलब्ध आहे, जीएस ट्रॉफी रेसिंग ब्ल्यू मेटालिक पेंटवर्कमध्ये उपलब्ध आहे आणि 719 कराकोरुम ऑरेलिस ग्रीन मॅट मेटालिक पेंटवर्कमध्ये उपलब्ध आहे.
प्रमाणित मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स आणि नवीन विकसित करण्यात आलेल्या ऑक्झिलरी हेडलाइट्स
ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या बीएमडब्ल्यू मोटोर्राड मोटरसायकल्सचे मालक बनण्याची सुविधा देण्यासाठी बीएमडब्ल्यू फायनान्शियल सर्विसेस इंडिया सानुकूल व स्थिर फायनान्शियल सोल्यूशन्स देईल. ग्राहक वेईकलची डिलिव्हरी होण्यापूर्वी त्यांचे कर्ज अगोदरच मंजूर करून घेऊ शकतात. संपूर्ण मन:शांतीसाठी बीएमडब्ल्यू मोटोर्राड बाइक्स तीन वर्ष, अमर्यादित किलोमीटर्स’साठी प्रमाणित वॉरंटीसह येतात. तसेच वॉरंटी चौथ्या व पाचव्या वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. रोड-साइड असिस्टण्स, 24×7 365 दिवसांचे पॅकेज ब्रेकडाऊन व टोइंगच्या स्थितींमध्ये अधिक सेवा मिळण्याची खात्री देतात.
नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस ॲडव्हेंचर
नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएसॲडव्हेंचर पूर्णत: नवीन डिझाइनसह येते, जी या मोटरसायकलला पूर्वीचे मॉडेल आर 1300 जीएस च्या तुलनेत वरचढ ठरवते. डिझाइनसह नवीन फ्लायलाइनमधून सुरूवातीपासून प्रबळता आणि वैविध्यतता दिसून येते, जेथे अनावश्यक गुंतागूंतींऐवजी भौतिकता व कार्यक्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. सेंट्रल बॉडीवर्क एरियामधील बाहेरील बाजूमध्ये प्रमुख घटक आहे 30-लिटर ॲल्युमिनिअम फ्यूएल टँक, जे मोठ्या प्रमाणात अनकव्हर आहे. उच्च दर्जाची वैशिष्ट्ये आहेत सुधारित बीएमडब्ल्यू एम्ब्लेम्स व दोन्ही बाजूस काढण्यात आलेले जीएस अक्षर, तसेच सीट एरियामधील दोन व्हिजिबल वेल्डिंग सीम्समधून टेक्नॉलॉजी व उत्पादन अचूकता दिसून येते. मोठे टँक आत्मविश्वासपूर्ण राइडची खात्री देते आणि प्रभावी फ्रण्टल वेदर प्रोटेक्शन देते. कार्यक्षम, अरूंद साइड सरफेसेस राइडशी परिपूर्णपणे जुळून जातात आणि ऑफ-रोडमध्ये देखील सर्वोत्तम एर्गोनॉमिक देतात.
तीन पर्यायी स्टाइल्समध्ये उपलब्ध – ट्रिपल ब्लॅक, जीएस ट्रॉफी आणि 719 कराकोरूम
दोन मोठ्या पारदर्शक विंड डिफ्लेक्टर्स (कॉकपीट पॅनेल्स) सह मोठे ॲडजस्टेबल विंडशील्ड हवा व वेदरपासून संरक्षण करते, ज्यामुळे लांबच्या प्रवासादरम्यान शांतमय व आरामदायी राइडचा आनंद मिळतो. ऑप्शनल इलेक्ट्रिक विंडशील्ड ॲडजस्टमेंट राइडरच्या वैयक्तिक पसंतीनुसार विंडशील्ड समायोजित करते, तसेच हँडलबार अचूकतेची खात्री देते. प्रमाणित हँड प्रोटेक्टर्ससह एक्स्टेंशन्स आणि एकीकृत केलेले टर्निंग इंडीकेटर्स अधिकतम संरक्षण देतात. अपर टँक कव्ह र्सच्या डाव्या व उजव्या बाजूस असलेले रबराईज्ड टँक ट्रेज नॉन-स्लिप, सुरक्षित स्टोरेज देतात.
नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस अँडव्हेंचरमध्ये अत्यंत आकर्षक फुल एलईडी हेडलॅम्पसह प्रमाणित म्हणून सर्वोत्तम, विशिष्ट लाइट आयकॉन आहे. लाइट युनिटमध्ये लो व हाय बीमसाठी एक एलईडी युनिट, तसेच डेटाइम रनिंग लाइट व साइड लाइटसाठी चार एलईडी अतिरिक्त युनिट्स आहेत. नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस अँडव्हेंचरमध्ये दोन एक्स्ट्रा-फ्लॅट ऑक्झिलरी हेडलॅम्प्ससह एलईडी टेक्नॉलॉजी देखील आहे, जे बॉडीवर्कमध्ये सुसंगतपणे समाविष्ट आहे. हे संयोजन रात्रीच्या वेळी रस्त्यावर सुस्पष्ट प्रकाश दिसण्याची खात्री देते, ज्यामुळे वाहतूकीमध्ये सहजपणे राइडिंग करता येते. प्रमाणित ‘हेडलाइट प्रो’सह मॅट्रिक्स फुल एलईडी हेडलॅम्पची बीम रस्त्यानुसार बेंड होते.
बेसिक व्हर्जनमध्ये नवीन बीएमडब्ल्यू आर 1300 जीएस अँडव्हेंचर राइडिंगसंदर्भात कोणताही अडथळा देत नाही. आकर्षक रेसिंग रेडमध्ये फिनिशिंग करण्यात आलेल्या या मोटरसायकलचा लुक ॲथलेटिक, सर्वोत्तम आहे, जो तुम्हाला समर्पित मोटरसायकलिंग ॲडव्हेंचर्सवर जाण्यास प्रेरित करते. सिल्व्हर रंगाचे टँक आणि राइडर व सहप्रवासीसाठी ब्लॅक व रेड रंगाच्या सीट्स आकर्षक कॉन्ट्रॅस्ट्स देतात. या कलर स्किमला पूरक काळ्या रंगाचे हँडलबार्स, काळ्या रंगाचे रिम्स आणि लाल रंगाचे हँड प्रोटेक्टर एक्स्टेंशन्स आहेत.
नवीन आर 1300 जीएस अँडव्हेंचरच्या ट्रिपल ब्लॅक व्हर्जनमधून मोटरसायकलची आकर्षकता दिसून येते. काळ्या रंगामधील ॲसेंट्स आणि उच्च दर्जाच्या टिंटेड क्लीअर कोटमध्ये फिनिशिंग देण्यात आलेली ॲल्युमिनिअम फ्यूएल टँक हे या अपवादात्मक विशिश्टतेचे हॉलमार्क्स आहेत. म्यूटेड, आकर्षक पृष्ठभागांचे लुक वर्ल्ड-टूरर एण्ड्युरोला लक्षवेधक बनवते. प्रमाणित इंजिन प्रोटेक्टर सिल्व्हर इन्सर्ट्ससह काळ्या रंगामध्ये आहे. ब्लॅक हँडलबार्स, ब्लॅक व्हील रिम्स आणि ग्रे हँड प्रोटेक्टर एक्स्टेंशन्स हे समकालीन ट्रिपल ब्लॅक कलर्स आहेत. रेडिएटर कॉल बॅग्जसाठी होल्डर्ससह मोठे ॲल्युमिनिअम रेडिएटर काऊल्स असण्यासह या मॉडेलमध्ये दोन ब्लॅक/ग्रे कम्फर्ट सीट्स, तसेच सीट हीटिंग, लगेज होल्डर आणि विंडशील्डसोबत मोठे विंड डिफ्लेक्टर्स आहे.
जीएस ट्रॉफी मॉडेलमध्ये ऑफ-रोड क्षमता आणि स्पोर्टी कलर स्किम आहे. रेसिंग ब्ल्यू मेटालिक पेंटवर्कला पूरक लक्षवेधक आकर्षक लाइट व्हाइट व आकर्षक रेसिंग रेड स्ट्रिप्स आहेत. ॲव्हस ब्लॅक मेटलिक मॅटमधील टेक्स्चर्ड पावडर-कोटेड पार्ट्स ॲल्युमिनिअम पार्ट्ससोबत आकर्षक कॉन्ट्रॅस्ट्स तयार करतात. या मॉडेल व्हेरिएण्टमधील उंच, रेड व ब्लॅक राइडर्स सीट स्पोर्टी, टू-टोन पॅसेंजर सीटसह सातत्यपूर्ण बेंच सीटची खात्री देते आणि रेड प्रोटेक्टर एक्स्टेंशन्सशी जुळून जाते.
स्टेनलेस स्टील इंजिन प्रोटेक्टरमधील ब्लॅक इन्सर्ट गोल्ड क्रॉस-स्पोक व्हील्ससह आकर्षक रंगसंगती निर्माण करते. रेडिएटर्सच्या पुढील बाजूस ब्लॅक ग्रिल्स आणि ऑक्झिलरी हेडलॅम्प्स प्रभावी स्टोनगार्ड प्रोटेक्शन देतात. स्पोर्ट विंडशील्ड आणि सहप्रवासीसाठी स्पोर्ट ग्रॅब हँडल्समधून जीएस ट्रॉफीची स्पोर्टी विशिष्टता अधिक दिसून येते. मोठे रेडिएटर काऊल्ससह रेडिएटर काऊल बॅग्जसाठी माऊंट्स आणि ॲल्युमिनिअम टँक ट्रेज प्रबळ डॉकिंग एलीमेंट्स देतात, ज्यामधून दूरपर्यंत विनासायास राइडिंग करण्याचा आनंद घेता येतो.
ऑप्शन 719 कराकोरूम मॉडेल व्हर्जनला विशेष ऑरेलिस ग्रीन मेटलिक मॅट कलरचे फिनिशिंग देण्यात आले आहे, जे मोटरसायकलच्या आकर्षकतेमध्ये अधिक भर करते. सोनेरी रंगामधील लाइन्स आणि शॅडो मिल्ड पार्ट्स पॅकेज उच्च दर्जाच्या लुकची खात्री देतात, तसेच टँककव्हरवर ‘Opt. 719’ बॅज आहे. गोल्ड ॲनोडाइज्ड रिम्स आणि हँडलबार्स विशेषत: लक्षवेधक आहे. प्रमाणित इंजिन प्रोटेक्टर सिल्व्हर रंगाच्या इन्सर्ट्ससह ब्लॅक रंगामध्ये आहे आणि हँड प्रोटेक्टर एक्स्टेंशन्स ग्रे रंगाचे आहेत. लहान ॲल्युमिनिअम रेडिएटर काऊल्स आणि ऑक्झिलरी हेडलाइट्सवरील प्रोटेक्टिव्ह ग्रिल व्यतिरिक्त या मॉडेल व्हेरिएण्टमध्ये ब्लॅक रंगामधील दोन कम्फर्ट सीट्स, सीट हिटिंग, लगेज रॅक आणि विंडशील्ड आहे.
नवीन R 1300 GS ॲडव्हेंचरची खासियत म्हणजे लीजेण्डरी ट्विन-सिलिंडर बॉक्सर इंजिन. या मोटरसायकलमध्ये सिरीजमध्ये आतापर्यंत उत्पादित करण्यात आलेले सर्वात शक्तिशाली BMW बॉक्सर इंजिन आहे. प्रथम R 1300 GS मध्ये सादर करण्यात आलेली नवीन डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक सुसंगत आहे, ज्याचे श्रेय इंजिनखाली असलेले ट्रान्समिशन आणि नवीन कॅमशाफ्ट ड्राइव्ह अरेंजमेंटला जाते. हे बॉक्सर इंजिन 7,750 rpm मध्ये 1,300 cc मधून 107 kW (145 hp) चे आऊटपुट आणि 6,500 rpm मध्ये 149 Nm चे अधिकतम टॉर्कची निर्मिती करते.