Published on
:
22 Jan 2025, 3:38 pm
Updated on
:
22 Jan 2025, 3:38 pm
सांगोला : सांगोला नगरपालिकेने सन 2024- 25 यावर्षाकरिता आज अखेर 1 कोटी 28 लाख 07 हजार रुपये वसुली केली आहे. उर्वरित 4 कोटी 84 लाख 20 हजार रुपये थकबाकी वसुलीसाठी नगरपालिकेकडून 6 वसुली पथकाच्या माध्यमातून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी थकबाकीदार इमारत व गाळे तसेच खुल्या जागेधारकांना नगरपालिकेकडून नोटीस बजविण्यात आल्या आहेत.
दरम्यान मुदतीमध्ये कर भरणा केला नाही तर नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता धारकांची नावे प्रसिद्ध करणे तसेच जप्तीची कारवाई केली जाणार असून, थकबाकीदारांनी वेळेत आपली थकबाकी भरून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.
सदर कर वसुली मोहिमेसाठी कार्यालय अधीक्षक सचिन पाडे, कर निरीक्षक रोहित गाडे, प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वसुली पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.