प्रवाशांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दु:ख व्यक्त
अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठीरेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न
-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डाव्होसहून प्रशासनाच्या संपर्कात, मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी, प्रशासनाकडून वेगाने मदतकार्य
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई (Jalgaon Train Accident) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. (Jalgaon Train Accident) अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडे रेल्वे स्थानकानजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. यावेळी जखमी प्रवाशांना…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2025
मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) स्वत: घटनास्थळी पोहचले असून पोलिस अधिक्षकांसह जिल्हा यंत्रणा युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) डाव्होस येथून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांनी (Jalgaon Train Accident) अपघाताची माहिती घेऊन प्रशासनाला मदतकार्यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत. जिल्हा प्रशासन आणि रेल्वे यंत्रणा समन्वयातून बचाव आणि मदतकार्य करीत आहे. मदतकार्य रात्रीही सुरु राहणार आहे. त्यासाठी ग्लासकटर, फ्लडलाईट्सह आवश्यक यंत्रणा अपघातस्थळी पोहचली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी दिली.