२४ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन
हिंगोली (Shaktipeeth Highway) : शक्तिपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी, नागपूर, गोवा, महाराष्ट्र द्रूतगती महामार्ग हा जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी तालुक्यातील जात असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे या (Shaktipeeth Highway) शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्यांनी विरोध दर्शवून २४ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
या (Shaktipeeth Highway) संदर्भात वसमत, कळमनुरी तालुक्यातील शेतकर्यांनी २२ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमुद केले की, महाराष्ट्र शासनाने २५ फेबु्रवारी रोजी शासन निर्णय क्रमांक असाधारण क्र.१०१ अन्वये शक्तिपीठ महामार्ग पवनार ते पत्रादेवी, नागपूर, गोवा, महाराष्ट्र द्रूतगती महामार्ग (विशेष) घोषित केले आहे. या राजपत्रात शेतकर्यांच्या शेताचे गट नं. व क्षेत्र नमुद केले आहेत.
महाराष्ट्र शासनाने आखरेला पवनार, पत्रादेवी, (नागपूर – गोवा) शक्तिपीठ महामार्ग हा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील, गिरगाव, पळसगाव, पिंपळा चौरे, गुंज, रूंज, आसेगाव, टाकळगाव, राजापूर, बाभुळगाव, रेणकापूर, लोण बु, हयातनगर, जवळा खु. तसेच कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळीवीर, जवळा पांचाळ, वसफळ, महालिंगी, दाभडी ही सर्व गावे जात असुन शेतकर्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी भूमिहीन होणार आहेत.
वसमत तालुक्यातील शेती ही पूर्णपणे पाण्याखालील बागयती शेती असुन शासनाने आखलेल्या या (Shaktipeeth Highway) व्यवसायिक प्रकल्पामुळे शेतकर्यांचे कधी ही न भरून होणारे नुकसान होत आहे. हा प्रकल्प तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी महामार्गाचे काम स्थगित केल्याचे आश्वासन देऊनही महामार्गासाठी पर्यावरण प्रमाणपत्र मिळविण्याची कारवाई शासनाने चालू केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांशी भूसंपादन करण्यासाठी आढावा बैठकांचे आयोजनही करण्यात आल्याचे दिसून येत असुन शेतकर्यांना बेसावध ठेवून महामार्गाचे काम अन्यायकारक पध्दतीने रेटण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकर्यांनी त्याचा निषेध नोंदविला आहे. शक्तिपीठ महामार्गाला शेतकर्यांनी विरोध दर्शवून २४ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते २ दरम्यान तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. हे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी स्विकारले. या निवेदनावर शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता
गोवा शक्तिपीठ (Shaktipeeth Highway) हा महामार्ग कळमनुरी, वसमत तालुक्यातून जात असुन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी भूमिहीन होण्याची शक्यता असल्याने या महामार्गाला विरोध दर्शविण्यात आला.